शिवकर्णा अंधारे यांची अटल भारतीय हिंदू फाउंडेशनवर उदगीर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती .

.


उदगीर...... मौजे सोमनाथपूर तालुका उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवकर्णा अंधारे यांची अटल भारतीय हिंदू फाउंडेशनवर उदगीर तालुका अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवाकर्णा अंधारे या सोमनाथपूर तालुका उदगीर येथील रहिवासी आहेत. ते मौजे सोमनाथपूर येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य पण आहेत. तसेच उदगीर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीच्या सदस्य पण आहेत. त्यांचे मौजे सोमनाथपूर येथे नेहमीच सामाजिक कार्य पण आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन, अटल भारतीय हिंदू फाउंडेशनवर उदगीर तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही संघटना राष्ट्रीय तत्वावर आधारित आहे. यासाठी राष्ट्रविचार, तत्व, संस्कृती, जपवणूक करून, त्याचा प्रचार व प्रसार समाजात करावा, अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात करण्यात आलेली आहे. त्यासाठी शिवकर्णा अंधारे यांची उदगीर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसे नियुक्तीपत्र पण त्यांना देण्यात आलेले आहे. या नियुक्तीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या नियुक्ती पत्रावर प्रणिता सुनील बेंबळे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष लातूर यांची स्वाक्षरी आहे.