मुजीब पटेल मानकीकर यांना सन्मानित

.


उदगीर...... मौजे बोरोळ तालुका उदगीर येथील मुजीब पटेल मानकीकर यांना नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. उदगीर तालुक्यातील मौजे बोरोळ येथील रहिवासी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्तव्यदक्ष वाहनचालक मुजीब पटेल मानकीकर यांनी कोविड 19 काळामध्ये उदगीर तालुक्यातील मौजे बोरोळ येथील नागरिकांच्या आरोग्याची 24 तास कामावर राहून सेवा बजावलेली आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी व मनमिळावू स्वभाव असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नुकतेच प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्यावतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन, नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. यावेळी त्यांना सन्मानपत्र पण देण्यात आलेले आहे. त्यांना सन्मानित करून व प्रमाणपत्र दिल्याबद्दल मित्र परिवारातर्फे सर्वत्र त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.