लाईफ केअर मधे मधुमेह , फुफ्फस रुग्नासाठी एक दिवस मोफत ओपीडी इतर तपासणीसाठी ५० टक्के सवलत - मा आ भालेराव

.


उदगीर 


      मधुमेह अर्थात डायबेटिक आणि फुफ्फस आजारांच्या रुग्नाकरिता लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे तज्ञ डॉक्टरांचा मोफत


सल्ला तसेच तपासणी मधे ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे . आर्थिक अडचणीच्या काळात रुग्णाचे आजारकडे दुर्लक्ष होवू नये , त्याच्या आजाराचे निदान होवुन उपचार घेता यावेत यासाठी मधुमेह आणि फुफ्फस आजाराच्या रुग्नासाठी आठवड्यतील एक दिवस मोफत ओपिडी सुरु करण्यात आल्याचे चेअरमन सुधाकर भालेराव यानी सांगितले .


    अस्थमा, टी बी, न्युमोनिया , धाप लागणे , कफ , थुंकीतून रक्त येणे अशी लक्षणे असलेल्या आणि कोरोना संशयित अशा रुग्णानाकरिता दर मंगळवारी डॉ ज्ञान विकास आणि डॉ शिवराज सुर्यवंशी या तज्ञ डॉक्टराची मोफत ओपिडी असणार आहे. HRCT Thorax , फुफ्फुसाचा सी. टी. स्कँन आदी तपासणी साठी ५०% सवलत देण्यात येणार आहे . 


  दर गुरुवारी मधुमेह रुग्नासाठी मोफत ओपिडी आणि रक्त तपासणीसाठी ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे . यासाठी रुग्णानी सकाळी आठ वाजता उपाशी पोटी रक्त तपासणी साठी येणे आवश्यक असल्याचे रुग्णालयाच्या वतिने सांगण्यात आले आहे . महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि सर्व खाजगी मेडिक्लेम सुविधा उपलब्ध अधिक माहिती करिता 


 73851555169 आणि 02385251800 या क्रमाकावर संपर्क साधावा असे आवाहन सी ओ ओ अमोल भालेराव यानी केले आहे 


  


   लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथिल स्पेशालिस्ट डॉक्टर्स , नर्स आणि हॉस्पिटल कर्मचारी यानी कोरोनाच्या भितिच्या वातावरणात सर्वोत्तम सेवा दिली. रुग्णानी दाखविलेल्या विश्वासामुळे 800 पेक्षा जास्त सिरियस पेशंटवरआय सी यु मधे यशस्वी उपचार करु शकलो आहोत . येणारा काळात ही कोरोना वाढण्याची शक्यता आहे मात्र घाबरुन जावू नका आपल्याला आरोग्या ची काळजीसाठी आणी सर्वोत्तम सेवा देण्यासाठी लाईफ केअर ची टीम तत्पर आहे .


 


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत