भाऊबीजेची अक्षरबीज भेट, एक नवा आदर्श

(नवोदित कवयत्रीच्या अकस्मीक पुस्तक प्रकाशनाने भाऊबीज भेट)


   . 


 उदगीर..लातूर  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्होटी क्र.२ हे छोटसं गाव. गायत्री ही प्राथमिक शिक्षण घेतअसलेली चिमुकली, कुठलाही वारसा नसताना शेकड्यावर कविता लिहिल्या पण त्या कविता पुस्तकरुपाने वाचकांसमोर कशा आणायच्या याचे ज्ञानही नाही आणि परिस्थितीही नाही. उदगीरच्या वाचक संवादचे प्रमुख आणि उपक्रमशील व्यक्तीमत्व अनंत कदम यांनी गायत्रीच्या कविता स्वखर्चाने पुस्तकरुपात आणून भाऊबीजे दिवशी व्होटी नं. २ या छोट्या गावात अकस्मीकपणे वाचकांसमोर आणल्या अन् सूर्यवंशी परिवाराला अश्चर्याचा धक्का दिला. या काव्यबन कवितासंग्रहाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा आणि निमंत्रितांचे कवीसंमेलन संत काशीमाई सांस्कृतिक सभागृहात पार पडले आणि आज  खऱ्या अर्थाने आगळी 'अक्षरबीज' साजरी झाली. चला कवितेच्या बनात या चळवळीचे मुख्य संयोजक अनंत कदम यांनी स्वखर्चाने पुस्तकाचे प्रकाशन करुन भाऊबीजेची अक्षरबीज भेट देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.


   प्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम यांच्या अध्यक्षतेखाली व बालव्याख्याती कु.रागिनी ढगे हिच्या हस्ते हा अविस्मरणीय प्रकाशन सोहळा पार पडला. तब्बल तीन तास चाललेले निमंत्रितांचे कवीसंमेलनही संस्मरणीय असेच झाले. कवीमित्र बालाजी मुंडे यांचे खुसखुसीत सूत्रसंचालन आणि कवी अंकुश सिंदगीकर, पत्रकार तथा कवी उध्दव दुवे, संयोजक अनंत कदम, बालकवयित्री गायत्री सूर्यवंशी आणि रागिनी यांच्या एकाहून  एक सरस रचनांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले. 


     कार्यक्रमाचे प्रास्तविक चला कवितेच्या बनातचे मुख्य संयोजक अनंत कदम यांनी मांडले तर शिवव्याख्याते  प्रदीप ढगे यांनी पुस्तकावर विस्तृतपणे बोलले. यावेळी कवयत्री गायत्री सूर्यवंशीचे आई-वडिल, आजोबा ,मामा व ईतर नातवंडासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संखेने उपस्थित होते. शेवटी  महादेव सूर्यवंशी यांनी आभार मानले.