जालना के. व्ही. कृषी अभियंता पंडीत वासरे यांनी गंगनबिड येथे बळीराजा निवासस्थानी शेतकर्यांची भेट .

.


उदगीर....... सीमाभागात बिदर जिल्ह्यातील कमालनगर तालुक्यातील दापका सर्कल येथे मौजे गंगनबिड येथे भारत कृषी समाज कर्नाटक कमालनगर ता. अध्यक्ष वाडीकर अंकूश लक्षमणराव यांच्या शेती निवासस्थानी *बळीराजा निवास* येथे शेतकर्यांना केरन आॅरगॅनिकच्या उत्पादकांचा वापर करताना कोण कोणत्या पिकांची कशी काळजी घेतली, या संदर्भात भेट घेतली. व विचार विनिमय केले. यावेळी मिरची अप्रतिम पिक, कशा पध्दतीने उत्पादन घेतले, उत्पादन वाढवण्यासाठी जमीन हा महत्त्वाचा घटक मानून मातीची कशी काळजी घ्यावी, तसेच मातीची नैसर्गिक जीवसृष्टी पुर्ववत करून जैविक सुपीकता कशी वाढवता येईल, यांचेही मार्गदर्शन शेतकर्यांना यावेळी करण्यात आले. 


          मातीची जैविक सुपीकता वाढवून व जमिनीचा पोत सुधारून उत्पादन कसे वाढवता येईल, यासाठी माती परिक्षण करून फळ शेती उत्पादनात जास्तीत जास्त कशी वाढ करता येईल, या बाबत मार्गदर्शन जालना कृषी तंज्ञ पंडित वासरे यांनी केले. यांच्या मते केरन कंपनीने आपल्या उत्पादनांचे एखाद्या कृषी विद्यापीठाकडून परिक्षण करून घावे, आणि आपले संशोधन सीध्द करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, शेतीतील उत्पादन वाढवताना मातीची काळजीघेणे अवश्यक आहे. असे मत यावेळी मांडले. यावेळी भानूदास वासरे, चंद्रपाल वाडीकर, कृष्णा वासरे, प्रतीक वासरे हे त्यांचे सहशेतकरी उपस्थित होते. शेवटी बोलताना वासरे म्हणाले की, अंकुश वाडीकर यांची शेती ही प्रगतीशील शेती आहे. त्यांनी या शेतात जे मिरचीचे उत्पन्न केले आहे, त्याला तोडच नाही. आज पर्यंत मी स्वतः केलेल्या सर्वेमध्ये मला पाहण्यात आलेले हे पहिले शेतकरी आहेत. अशी प्रशंशा अंकुश वाडीकर यांच्या संदर्भात यावेळी बोलताना केली.