शिक्षकांच्या हस्ते इमारतीचे पूजन करून रचला नवा इतिहास...

.


राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ द्वारा संचलित, सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर, लवकुश बालविकास मंदिर उदगीर,विद्यालयामध्ये नवीन बांधलेल्या इमारती चे पूजन करण्यात आले,अतिशय उत्कृष्ट प्रकारे नियोजन झाले. जेव्हा मी संस्थाचालकांना विचारले की प्रमुख पाहुणे पुजनसाठी कोण येणार आहेत.. त्यावेळेला संस्थाचालकांनी सांगितलं सर्व शिक्षकांच्या हस्ते आपण पूजन करणार आहोत...शिक्षक हाच शाळेचा व विद्यार्थ्यांचा भाग्यविधाता आहे तर आपण त्यांच्या शुभ हस्ते पूजन करू या.... संपूर्ण कार्यकारणी अतिशय उत्कृष्ट व कुशल विचारांचे असल्यामुळे हा नवा इतिहास उदगीर नगरीत काय अख्ख्या विश्वात त्यांनी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी अशी कामगिरी केली.


     गणेश पूजनाने इमारतीचेच पूजन करण्यात आले. पहिल्या वर्गाचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा कुलकर्णी व तसेच बालवाडी सहशिक्षिका सौ. सुनिता दुंपलवार,सौ. जयश्री स्वामी सौ.अरुणा देशमुख,..सेविका. तसेच दुसरा वर्ग... सौ.अनिता.. शानेवार, सौ. राचम्मा मळभगे, 3रा वर्ग. सौ. धोंड अनुराधा,सौ. सगरबई कांबळे, सौ.संगीता लाळे .सेविका 4 वर्ग .. सौ. नीता गडीकर, सौ माया होनराव बाई,5 वा वर्ग. ..सौ.मंगल वाडकर ,सौ. भाग्यश्री पाटील 6 वा वर्ग..सौ. प्रतिभा विश्वनाथे,सौ. वृषाला जाधव,7 वा वर्ग , श्री रोडे बालाजी, श्री पटवारी रामेश्वर, 8 वा वर्ग,.. श्री संकलवाड दत्तात्री, श्री रोहित पाटील.9 वा वर्ग श्री प्रशांत पाटील, संदीप पाटील, नवीन स्टेज ... सौ.आशा बेंजर्गे, श्री दिलीप बिरादार,सौ. सोलापूर ताई सेविका ..


अशा प्रकारे पूजनाचे नियोजन प्रत्येक वर्गाचे अतिशय विधिपूर्वक पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्षा अपर्णाताई पटवारी कार्यवाह, माननीय श्री डॉक्टर अंबादास राव देशमुख, कोषाध्यक्ष श्री भगवानराव वट्टमवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री उमाकांत बुधे, बांधकाम समिती अध्यक्ष श्री बाबुराव कुलकर्णी, पालक वर्ग कार्यक्रमासाठी उपस्थित होते.दीपक उत्सवामध्ये दीपावलीच्या शुभमुहूर्तावर पहिल्याच दिवशी असा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणारा कार्यक्रम विद्यालयात झाला यामुळे शिक्षक व संस्था अतिशय आनंदित होते.


विद्यालयामध्ये सत्रांत बैठक सुद्धा घेण्यात आली.विश्वामध्ये सगळीकडे लोक डाऊन असताना सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय आतल्या मराठी व सेमी या विभागाच्या शिक्षकाने कशाप्रकारे कार्य केले या कार्याचा लेखाजोखा सुद्धा सर्व शिक्षकांनी मांडला,विद्यार्थ्यांना दूर न ठेवता दोघांमधील दुवा असणारा इंटरनेट यांच्यामुळे झूम व गुगल मिटिंग वर अभ्यासक्रम घेण्यात आला व पालकांशी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यात आला या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत अशा पालकांकडे प्रत्यक्ष भेट देऊन पालकांचे विचारपूस करण्यात आली या सर्व गोष्टींचा विचार विनिमय बैठकीमध्ये करण्यात आला .बऱ्याच शिक्षकांनी लेख व्हिडिओ कविता चित्रे पालकांची भेट समाजकार्य गोरगरिबांना मदत या सर्व गोष्टी लोकांच्या काळामध्ये केलेला आहे समाजामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असताना केवळ शाळेसाठी काहीतरी समाजाचे काही देणे लागते म्हणून शाळेतील शिक्षकांनी या ठिकाणी गोरगरिबांचे लग्न आहे त्यांना निधी म्हणून दिला आणि तसेच काही जणांच्या मोबाईल साठी अडचणी असल्या तरी त्यांना पैसा उपलब्ध करून दिला.काही जणांनी मोफत गोळ्या औषधांचे वाटप केला मास्कचा वाटप केला अशा प्रकारे सरदार वल्लभाई पटेल विद्यालयातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत लोक डाऊन मध्ये शैक्षणिक कार्य सोबत सामाजिक कार्यही केले या सर्व गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला व सर्व संस्थाचालकांनी सर्व शिक्षकांना कौतुकाची थाप पाठीवर दिली व असेच कार्य करत राहून देशहितासाठी कार्य करत जावे अशा भावनाही व्यक्त केल्या.कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यूही विश्रांती असे ब्रीद वाक्य असलेले सांगणारे आमचेश्री व्यंकटेश देशपांडे यांनी सर्व शिक्षकांना फोनवरून दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.,सुरुवातीपासून शाळेच्या कामासाठी मदत करणारे दृश्य ,अदृश्य स्वरूपातील सर्व लोकांचे मनःपूर्वक आभार आणि आमच्या विद्यालयासाठी नेहमी प्रेरणा दिली .


      विद्यालयातील सर्व शिक्षकांचे लोक डॉन मधील केलेल्या कार्याबद्दल खूप खूप कौतुक.


          सौ.मंजुषा कुलकर्णी


              मुख्याध्यापिका


         सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर...


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत