उदयगिरि लॉयन्स नेत्ररुग्णालयात, अलीना सेवाभावी संस्था शिबिराची सांगता .

.


उदगीर ..... उदयगिरि लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय व अलीना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, उदगीरच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी, सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची सांगता नुकतीच झाली. तसेच जिल्हा उद्योग केंद्र लातूर व मिटकॉन कन्सटन्सी इंजिनीयर पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फॅशन डिझाईन प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप विभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, उदयगिरि लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया, माजी सरपंच सुनील सोमवंशी, सामाजिक कार्यकर्ते अलाउद्दीन किनीवाले, पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड, ग्राम विकास अधिकारी बी.जी.बिरादार, पोलीस पाटील मधुकर रंगवाळ, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अलीशिबाशेख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जवळकर म्हणाले की, ग्रामीण भागात शिबिर आयोजित करून, गरजू पर्यंत सेवा उपलब्ध करून महिलांनी प्रशिक्षणातून स्वयंरोजगार निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रवीण मेगशेट्टी म्हणाले की, प्रमाणपत्र वितरण स्तुत्य उपकर्म यातून महिला सक्षम महिला होतात. उदयगिरि लॉयनस नेत्र रुग्णालयाच्या कार्याचा गौरव यावेळी त्यांनी केला. डोळ्यांनी जग कळु शकते, म्हणून वेळीच उपचार करून घ्यावेत. संस्थेला शिबिराचे माध्यमातून चांगले काम करण्याची संधी मिळते. यावेळी श्वेता कांबळे, उत्कर्षा गायकवाड, संगीता कांबळे, सोनी सोमवंशी, यांच्यासह तीस जणांना यावेळी प्रमाणपत्राचे वितरण झाले. तर साठ नेत्र रुग्णांची तपासणी होऊन, 12 मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे रुग्ण यावेळी आढळले. नेत्रतपासणी डॉक्टर अंकिता लखोटिया, विष्णू पवार, कृष्णा मुरारी, सलमान शेख यांनी केले. तर प्रास्ताविक अखिल सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण जहुरे यांनी केले. आभार शेख अजीमोदींन यांनी मानले.