भाजपा युवा मोर्चाच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी विशाल रंगवाळ यांची निवड

.


उदगीर...... उदगीर शहर व तालुक्यात सतत सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे युवा नेते विशाल राजकुमार रंगवाळ यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .


       लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर ,खा.सुधाकर शृंगारे ,अनु.जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी आ.सुधाकर भालेराव, माजी आ.गोविंद केंद्रे,युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर ,लातूर जि. प.अध्यक्ष राहुल केंद्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, सरचिटणीस संजय दोरवे,अमोल भालेराव,माधव टेपाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विशाल राजकुमार रंगवाळ याना निवडीचे पत्र देण्यात आले. विशाल रंगवाळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उदगीर मध्ये सुरुवात करणारे तथा नाशिक येथे आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले उदगीरच्या जनसंघाचे माजी नगरसेवक विश्वनाथराव रंगवाळ यांचे नातू व भाजपचे माजी शहराध्यक्ष राजकुमार रंगवाळ यांचे पुत्र आहेत .आजोबा व वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणारे विशाल रंगवाळ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे प्रशांत(बबलू)रंगवाळ, अशोक बिरादार,प्रा. संजय जामकर,पद्माकर मामुलवार, अमोल कुलकर्णी,रोहित हिवरे,संतोष अनंतवाळ, विकी मामुलवार ,प्रशांत रंगवाळ व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.