पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बाल दिवस म्हणून साजरा

.


उदगीर....... 


          उदगीर तालुक्यातील श्री पांडुरंग विद्यालय, कलुर येथील विद्यार्थीनी कु. प्रज्ञा अण्णाराव कांबळे या विद्यार्थिनीने आपल्या घरीच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूं यांचा जन्मदिन बालदिवस म्हणून घरीच ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. या बालदिवसानिमित्त शासनाकडून बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. 1ली ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये बालदिवस सप्ताह साजरा करण्यासाठी 7 गटात वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले आहेत. 


          कु. कांबळे प्रज्ञा अण्णाराव ही विद्यार्थीनी- वर्ग- 5वी श्री पांडूरंग विद्यालय कल्लूर या शाळेतून 'चाचा नेहरूंना पत्र' या उपक्रमांतर्गत छान पत्र लिहिलं आहे. चाचा नेहरूंचा जन्मदिन या बालचिमुकलीने घरीच साजरा केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.