पर्यावरणपूरक आकाशकंदीलाने ग्रामीण भागातील घरं सजली

.


उदगीर...... 


      उदगीर तालुक्यातील श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून कलाशिक्षक- नादरगे चंद्रदीप यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील कसे बनवावेत यासाठी विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य व पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याची कृती सांगितली. प्लास्टिक हे पर्यावरणातील सर्वच घटकांसाठी खूप घातक असल्या कारणाने प्लास्टिक मुक्त भारत बनविण्यासाठी श्री पांडूरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकाराची पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविली आहेत. त्यात कांबळे प्रज्ञा अण्णाराव- वर्ग- 5वी, कांबळे सिद्धी बालाजी- वर्ग- 5वी, कुंजटवाड ज्ञानेश्वर रमाकांत- वर्ग- 7वी, केसगीरे काशीनाथ परशुराम- वर्ग- 7वी, कुंजटवाड अस्मिता रमाकांत- वर्ग- 8वी अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. म्हणून ग्रामीण भागातील घरे पर्यावरणपूरक आकाशकंदीलाने आणि पणत्यांनी सजली आहेत. रंगबेरंगी वेगवेगळ्या आकाशकंदीलाने आणि सजवलेल्या पणत्यांनी घरातील आणि गावातील वातावरण रमणीय झाले आहे. उजेडाची ही रंगाई पाहून मन प्रसन्न होत आहे. त्याचबरोबर कोरोना या महाभयंकर संकटात अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. म्हणून श्री पांडूरंग विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निश्चय केला आहे. कलाशिक्षक- नादरगे चंद्रदीप बालाजी यांच्या या पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याच्या स्तुत्य, नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष- गोविंदरावजी केंद्रे साहेब, सचिव- विनायकरावजी बेंबडे साहेब, मुख्याध्यापक- नादरगे एस. व्ही., तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांनी कलाशिक्षकाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत