*स्वा.रा.ती.म विद्यापीठाच्या वेळकाढू व गैरव्यहाराला कंटाळून राजभवणावर धरणे.*

*सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव यांचा ईशारा.*



उदगीर:-नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये अनेक गंभीर व दखलपात्र गोष्टी बेकायदेशीरपणे चालू असून सदर प्रकरणात विद्यापीठाचे कुलपती या नात्याने महामहिम राज्यपाल महोदयांनी सदर बाबीची दखल घेऊन दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून माननीय राज्यपाल कार्यालय राजभवन मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व मास विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी राज्यपालांना पाठवलेल्या ई-मेल मध्ये अधोरेखित केले आहे व आमच्या जीवितास जे काही बरे वाईट होईल त्यास आपण जबाबदार असाल असे देखील नमूद करण्यात आले आहे.


           महामहिम राज्यपाल महोदय यांना पाठवलेल्या निवेदनात पुढील मागण्या मांडण्यात आल्या.1)कोव्हिडं 2019 च्या लॅब उभारणीत प्रचंड आर्थिक अफरातफर करण्यात आलेली आहे आणि मर्जीतील लोकांना या खरेदी मध्ये सदस्य करून आर्थिक गैरकारभार करण्यात आलेला आहे. 2)कोव्हिडं 2019 च्या लॅब उभारणीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. 3)ऑनलाईन परीक्षेत एवढा गोंधळ झाला पण कोणावर कार्यवाही नाही व परीक्षेचे टेंडर घेणाऱ्या कंपनीला देखील काळ्या यादीत न टाकता पाठीशी घालणे यात पण आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. 4)एकाच व्यक्तीवर अनेक जबाबदारी देऊन विद्यार्थ्यांच्या पैश्यांची लूट करण्यात येत आहे. 5)सिनेट सदस्य नात्याने मागवलेली माहिती वेळेत न देणे. 6)बंधारा बांधणी मध्ये तांत्रिक मान्यता न घेता ई-टेंडर न करता कामे करण्यात आली. 7)राज्यपाल कार्यालयाला पाठवायचे म्हणून निकाल लवकर लावला म्हणायचं आणि ऑफिस व्हेरिफिकेशन च्या नावाखाली मार्कमेमो राखून ठेवायचे आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिले जाते हे त्रास देणे बंद होऊन विद्यार्थ्यांना वेळेत मार्कमेमो दिले पाहिजे. 8) बी.ए पॉलिटिकल सायन्स चे पेपर तपासताना चुकीची उत्तर संच वापरून अनेक विद्यार्थी नापास झाले यात पण कुणावर कार्यवाही करण्यात आली नाही असे अनेक विषय असून महामहिम राज्यपाल महोदयांनी सर्वांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावं अन्यथा हे विद्यापीठ विद्यार्थ्यांचे न राहता भ्रष्ट,मुजोर,हफ्तेखोर लोकांचे अधिकृत कार्यालय होईल कृपा करून आपण वरील सर्व मुद्द्यांवर लक्ष द्यावे अशी विनंती सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे व मास विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी केले आहे.