उदयगिरीत 'राष्ट्रीय शिक्षण दिवस' साजरा

.


उदगीर....... येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या दिवसाचे महत्त्व प्रतिपादन करताना डॉ. दीपक चिद्दरवार म्हणाले, 'मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून केलेल्या कार्याची माहिती पुढील पिढीला व्हावी तसेच त्यांचे शिक्षण विषयक विचार आजच्या काळातही कसे सुसंगत आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकला .यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.मनोहरराव पटवारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव, दिनविशेष समिती प्रमुख दीपक चिद्दरवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. डॉ.मकबूल अहमद, प्रा. डॉ. ए. यू. नागरगोजे तसेच अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत