अंध अमोलला अव्होपाने डोळस केले

.


उदगीर....... उदगीर येथील डोळ्याने अंध असूनही शिक्षणाची ओढ असलेला पण आर्थिक परिस्थिती जर्जर असल्यामुळे ज्ञानार्जन करण्यात अडथळे येत होते त्याला अँनरॉईड मोबाईल की ज्याद्वारे अंधांसाठी विशेष मोबाईलअँप द्वारे शिक्षण घेता येते त्यासाठी 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी ची आवश्यकता होती .आईवडील मोल मजुरी करत असल्याने महागडा मोबाईल घेणे परवडत नव्हते .अमोल कालिदास माकेने उदगीर येथील आर्यवैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन(अव्होपा)उदगीर या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेकडेकडे मदत मागितली .अव्होपाने त्यांच्या भावी शिक्षणाच्या सोयीसाठी मागणी लगेच मंजूर करून त्यालाअँनरॉईड रेड मी ए-वन मोबाईल फोन दिवाळीच्या मुहूर्तावर अव्होपाचे सचिव प्रा.सुनील वट्टमवार,कोषाध्यक्ष बालाजी बुन्नावार, विजयकुमार गबाळे व अनिल मारमवार यांच्या हस्ते देऊन त्याचा शिक्षण घेण्याचा मार्ग सुकर करून त्याला डोळस करण्याचा प्रयत्न केला.यासाठी अव्होपाचे अध्यक्ष डॉ.दीपक चिद्दरवार, सचिव प्रा.सुनील वट्टमवार,कोषाध्यक्ष बालाजी बुन्नावार, विजयकुमार गबाळे,अनिल मारमवार ,सुधाकर पंदिलवार यांनी पुढाकार घेतला.


        अमोल माके हा कै. बापूसाहेब एकम्बेकर महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षाला शिकत असून त्याला शिक्षणासाठी अजून मदतीची आवश्यकता आहे तरी अव्होपा सारख्या इतर सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन अमोल आणि अश्या अनेक अंधांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याला आत्मनिर्भर करता येते असे आवाहन अव्होपाचे सचिव प्रा.सुनील वट्टमवार यांनी केले