तर्कसंगत विचार मांडणारी साहित्यकृती म्हणजे मी नास्तिक का आहे ? हि होय .      -- पवन बिरादार .

.


उदगीर......  व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीनुसार प्रत्येकाच्या भावना  व विचार वेगवेगळे असुशकतात  व त्यानुसार ते आपले तर्क वितर्क चालवतात . अशाच शहिद भगतसिंग यांच्या धारदार आचार विचारासह तर्कसंगत विचार मांडणारी साहित्यकृती म्हणजे मी नास्तिक का आहे हि होय असे मत ईंजि.पवन बिरादार यांनी व्यक्त केले.


      चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गत पार पडलेल्या व संवादकाच्या आई शिवमती कौशल्या भाऊसाहेब बिरादार यांनी अध्यक्षस्थान भूषवलेल्या २२९ व्या वाचक संवादात शहिद भगतसिंग यांचे विचार, पत्रसंवाद आणि निबंध लेखनाचा संग्रह असलेल्या मी नास्तिक का आहे ? या शहिद भगतसिंग याच्या साहित्यकृतीवर ईंजि.पवन कौशल्या भाऊसाहेब बिरादार यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भगतसिंगानी त्यांच्यावर लागलेल्या नास्तिकपणाच्या लांछनावर वाचकांना या साहित्यकृतीच्या माध्यमातून जानीवकरुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.  हा नास्तिकपणा त्यांना मिळालेल्या क्षणिक प्रसिद्धीतुन किंवा अहंकारातुन आलेला नाही तर ईश्वराच्या उपस्थितीबाबत उत्पन्न झालेल्या विचारामुळे आलेला आहे. भगतसिंगाच्या विचारप्रणालीचे असे प्रत्यय देणारे अनेक लेख, त्यांचे विचार, पत्रसंवाद आणि निबंध लेखनाचा संग्रह असल्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचुन समजुन घेतले पाहिजे .


      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्ह संपन्न झालेल्या या संवादा नंतर झालेल्या चर्चेत आमगे नम्रता, भाऊसाहेब बिरादार यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी मान्यवरांचा ग्रंथभेट व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. शेवटी कौशल्य बिरादार यांनी यथोचित अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम  यांनी केले तर आभार  कु. विशाखा बिरादार  हिने मानले..