*माफसूत सहायक ते सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीच्या मागणीसाठी एक दिवसाची सामुहिक रजा*

.


उदगीर.... 


महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त उदगीर येथील सर्व पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालये, पशुपैदास प्रक्षेत्र आणि उपकेंद्र आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक व समकक्षांची गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या “सहायक ते सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीच्या” मागणीची विद्यापीठ प्रशासनाने साधी दखल सुद्धा न घेतल्याने दि. ११ नोव्हेंबर रोजी लाक्षणिक स्वरूपात एक दिवसाची सामुहिक रजा घेऊन मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढविली आहे. माफसू हे बहुतांश देशातील एकमेव असे विद्यापीठ आहे की जेथे सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक अशी धोरणात्मक पदोन्नती नाही. प्रशासन सहयोगी प्राध्यापकांच्या रीक्त जागा सरळ सेवेने भरण्यास अनुत्सुक आहे. अशा धोरणात्मक चुकामुळेच आजमितीस विद्यापीठातील सर्व आस्थापनामिळून सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांची एकुण संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. बारा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या सहायक प्राध्यापकांची पात्रता असून सुद्धा पदोन्नतीपासून वंचित राहिले आहे. त्याकारणाने अपेक्षित प्रगती रखडली आहे. प्रचंड आर्थिक नुकसानासोबत त्यांचे मनोधैर्य सुद्धा खचले आहे. मानसिक कुचंबनेसोबत प्रगतीचे दारे बंद असल्यामुळे याचा विपरीत परिणाम शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्योंच्या गुणवत्तेवर होत असल्याचे दिसत आहे. प्राध्यापक वर्गात निराशेचे वातावरण आहे. अतिशय तुटपुंज्या मनुष्यबळावर शिक्षण, संशोधन आणि विस्ताराचा गाडा ओढत असलेल्या सहायक प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाकडे आणि सहयोगी प्राध्यापक भरतीकडे विद्यापीठ प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करीत आहे. सहायक प्राध्यापकांना कालबद्ध पदोन्नती सोबत सहाव्या वेतन आयोगाचे वेतनवाढीचा फरक, उच्च शिक्षणाचे दोन वेतन अंशदान, पगारातून वर्षानुवर्षे कपात केलेली डी.सी.पी.एस. आणि एन.पी.एस.रक्कम खात्यात जमा न करणे, बदली धोरण, एपीआय, सातवा वेतन आयोग हे वैधानिक लाभ सुद्धा आजतागायत अप्राप्त आहे. कालानुरूप व नियमितपणे देय लाभ मिळाल्यास प्राध्यापकांमध्ये उत्साहवर्धन होईल, आणि त्याचा विद्यापीठ प्रगतीत लाभ होईल.


इतक्या मोठ्या प्रमाणात अन्याय करणारे देशातील कदाचित एकमेव विद्यापीठ असावे. मा. राज्यपाल तथा कुलपती आणि मा. मंत्री तथा प्रती कुलपती यांनी विद्यापीठ प्रशासनातील औदासिन्य दूर करण्यासाठी हस्तक्षेप करून वर्षानुवर्षे दुर्लक्षित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी निर्देशित करावे असा सूर निघत आहे. सहायक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक ही कालबद्ध पदोन्नती आणि सहयोगी प्राध्यापक पदभरती यावर विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यवाही व्हावी व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तीव्र लढा देण्याचा ठाम निर्धार प्राध्यापक संघटनेने केलेला आहे. मागणी वर कार्यवाही न झाल्यास दैनंदिन आभासी कामावर आणि तीन डिसेंबर रोजी विद्यापीठ वर्धापन दिनावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. प्राध्यापक वर्गाच्या रास्त मागण्या प्रती प्रशासनाकडून त्वरित कार्यवाही अपेक्षित आहे.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत