विभागीय कृषी सह संचालक जगताप यांची हत्तीबेटास भेट

.


उदगीर.... --


लातूरचे विभागीय कृषी सह संचालक टी. एन. जगताप व जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रेय गावसाने यांनी गुरुवारी हत्तीबेट पर्यटन स्थळास भेट देवून तेथील वनसंपदेची व पर्यटन विकासाची पाहणी केली.


 कृषी सह संचालक जगताप यांच्या हस्ते हत्तीबेटावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कृषी उपसंचालक आर. टी. मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थंकर,तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, देवर्जनचे मंडळ कृषी अधिकारी बी. व्ही. मुंडे, कृषी पर्यवेक्षक सुनील देवनाळे, आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नितीन दुरुगकर यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


  प्रारंभी व्ही. एस. कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. व हत्तीबेटाची माहिती सांगितली.


कृषी सह संचालक जगताप व जिल्हा कृषी अधीक्षक गावसाने यांनी देवर्जन परिसरातील कृषी विभागाचा आढावा आपल्या कर्मचाऱ्यांकडून घेतला. व त्यांनी या परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.