लातूर येथे शिवकर्णाताई अंधारे यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सत्कार.

.


उदगीर... मौजे सोमनाथपूर तालुका उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवकर्णाताई अंधारे यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. अटल भारतीय हिंदू फाउंडेशन संघटनेच्या उदगीर तालुका अध्यक्षपदी शिवकर्णाताई अंधारे यांची निवड झालेली असून, त्या भाजपाच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे मौजे सोमनाथपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन दक्षता समितीच्या सदस्य पण आहेत. मौजे सोमनाथपूर येथे नेहमीच त्यांचे सामाजिक कार्य आहे. याची दखल घेऊन अटल भारतीय हिंदू फाउंडेशन संघटनेच्या वतीने ही निवड करण्यात आलेली आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल भाजपा महिला मोर्चाच्या वतीने लातूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष स्वाती जाधव, प्रदेश सचिव मीनाक्षी पाटील, प्रदेश सदस्य उत्तराताई कलबुर्गे, मधुमती कनशेट्टे, अनिता बिरादार, जया काबरा, मंगला काळा, जयश्री टिळेकर, सुरेखा पुरी, सुनिता मांडगे, श्रीदेवी गुलबिले, ललिता कांबळे, लता भोसले इत्यादी जण उपस्थित होते. लातूर या ठिकाणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सत्कार केल्याबद्दल सत्कारमूर्ती शिवकर्णाताई अंधारे यांच्यावतीने भाजपा महिला मोर्चाच्या सर्व सदस्यांचे यावेळी आभार मानले.