तरुणाईने मैदानी खेळाकडे वळावे: जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांचे मत

.


उदगीर (वार्ताहर)


 


खेळ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे,सहकार्य,संघभावना व खिलाडूवृत्ती शिकवणारा खेळ आपल्या जगण्याला दिशा देतो.तरुणांनी मैदानी खेळांवर लक्ष देऊन जगणे समृद्ध करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले.



बामणी येथे आयोजित व्हाॕलीबाॕल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.पोलिस पतसंस्थेचे चेअरमन राजकुमार बिरादार यावेळी उपस्थित होते.


    


मैदानी खेळांमधून शारीरिक सुदृढता येते.याशिवाय सामाजिकतेचे शिक्षण खेळातूनच मिळते.नेतृत्वगुणही खेळामधूनच विकसित होतात.मैदानावर होणारा शारीरिक विकास हा आरोग्य सुद्रृढ करणारा असतो त्यामुळे नव्या पिढीने खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे प्रतिपादन अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पुढे बोलताना केले.


  अलिकडच्या काळात मोबाईल व टी.व्ही.मुळे मैदानी खेळाकडे होणारे दुर्लक्ष चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले .जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.