*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दिला रांगोळीतून सामाजिक संदेश*

.


उदगीर.... 


      उदगीर तालुक्यातील श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील कलाशिक्षक- नादरगे चंद्रदीप बालाजी यांनी दीपावली निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उपक्रम राबविले आहेत. राबविलेल्या या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी हिररीने सहभाग नोंदविला आहे. त्या अनुषंगाने आज ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्वतः उपक्रमशील बनले आहेत. प्लॅस्टिक हे पर्यावरणातील सर्वच घटकांसाठी खूप घातक असल्या कारणाने प्लॅस्टिक मुक्त भारत बनविण्यासाठी श्री पांडूरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी धनलक्ष्मी निमित्ताने वेगवेगळ्या आकाराची निसर्गनिर्मित पाना-फुलांची तोरण बनऊन दरवाज्यांना सजविली आहेत. बाजारातील प्लॅस्टिक पाना-फुलांच्या माळेचा, तोरणांचा त्यांनी धिक्कार केला आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक आकाशकंदील अनेक विद्यार्थ्यांनी बनविली आहेत. म्हणून ग्रामीण भागातील घरे पर्यावरणपूरक आकाशकंदीलाने आणि पणत्यांनी सजली आहेत. रंगबेरंगी वेगवेगळ्या आकाशकंदीलाने आणि सजवलेल्या पणत्यांनी घरातील आणि गावातील वातावरण रमणीय झाले आहे. उजेडाची ही रंगाई पाहून मन प्रसन्न होत आहे. त्याचबरोबर श्री पांडूरंग विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निश्चय केला आहे. 


         कोरोना या महाभयंकर संकटात अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. हा कोरोना आता थोडाफार आटोक्यात आला असल्याकारणाने शासनाने बस सेवा, दुकाने, बाजारपेठा, मंदिरे सर्व कांही खुले केले आहेत. सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत परंतु हा कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट झाला नाही. आजही बाजारात मास्कविना बरेच नागरिक फिरत आहेत. अशा नागरिकांना सावध करण्यासाठी आणि राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून वारंवार सांगितले जात आहे .त्यासाठी मास्क अत्यंत गरजेचे आहे.म्हणून कु. बेंबडे राणी माधव या विद्यार्थिनीने मास्क ची रांगोळी साकारून मास्कचा नियमित वापर करावे. असा सामाजिक संदेश रंगोळीतून जनमानसांना दिला आहे. धनलक्ष्मी निमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकारांच्या सुंदर रांगोळ्याही अंगणात साकारल्या आहेत. त्याभोवती पणत्यांचाही वापर केल्याने त्या रांगोळ्या अधिकच सुंदर दिसत आहेत. त्यात कु. कांबळे प्रज्ञा अण्णाराव वर्ग 5 वी, सुरनर ज्ञानेश्वरी वामन वर्ग 6 वी, धनगे वैष्णवी प्रकाश वर्ग 6 वी, वडेर स्नेहल मारोती वर्ग 9 वी, बिरादार गीता विष्णुकांत वर्ग 10 वी, बेंबडे राणी माधव वर्ग 10 वी, कुंडगीर वैष्णवी सोनबा वर्ग 10 वी, होळे वैभवी सुभाष वर्ग 10 वी अशा अनेक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष- गोविंदरावजी केंद्रे साहेब, सचिव- विनायकरावजी बेंबडे साहेब, मुख्याध्यापक- नादरगे एस. व्ही., तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.