रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे, डॉ. मानुरे विक्रम यांना अपघातग्रस्त रुग्णास वाचवण्यात यश.

.


उदगीर....... उदगीर येथील शेल्हाळ रोडवरील प्रसिद्ध उदयगिरि मल्टीस्पेशलिटी व एक्सीडेंट हॉस्पिटल येथे नव्याने रुजू झालेले, डॉ. मानूरे विक्रम यांना, अपघातग्रस्त दोन रुग्णांना वाचवण्यात नुकतेच यश प्राप्त झालेले आहे. याची थोडक्यात माहिती अशी आहे की, सहा नोव्हेंबर 2020 रोजी नामे गोपाळ बिरादार राहणार विजयनगर गौंडगाव तालुका देवणी हा आपल्या बाईकवरून प्रवास करताना, रोड अपघातात जखमी झाला. व या अपघातात त्याच्या मेंदूला मार लागून रक्ताची गाठ झालेली होती. अशा परिस्थितीत त्याला उदयगिरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, उदगीर येथे दाखल करण्यात आले. यावेळी तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत त्याच्या मेंदूवर आलेली रक्ताची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश प्राप्त झालेले आहे. तसेच दुसरा रुग्ण नऊ नोव्हेंबर 2020 रोजी नामे रामराव जाधव राहणार माळेगाव तांडा, तालुका कमालनगर जिल्हा बिदर हा पण बाईकवरून प्रवास करताना अपघातात जखमी झाला. व त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे, तो बेशुद्धावस्थेत पडला. अशा परिस्थितीत त्याला पण उदयगिरि हॉस्पिटल मध्ये तातडीने दाखल करण्यात आले. व तातडीने त्याच्यावर यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आली. याचा पण जीव वाचवण्यात डॉक्टरांना फार मोठे यश आलेले आहे. आज पाहिल्यास दोन्ही अपघातग्रस्त रुग्ण हे चांगले होऊन उपचार घेत आहेत. याकामी मेंदूतज्ञ डॉ.मानुरे विक्रम यांना यश प्राप्त झालेले आहे. या शस्त्रक्रियेच्या कामी डॉ. माधव चंबुले, डॉ. बलशेटवार, भूलतज्ञ डॉ निलेश जगताप यांचे पण शेवटपर्यंत शस्त्रक्रियेच्या कामात सहकार्य लाभलेले आहे.विशेष म्हणजे या दोन्ही अपघातग्रस्त रुग्णाकडून एकही पैसा सुरुवातीला दाखल करून न घेता, शस्त्रक्रिया केलेली आहे. यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व स्तुती होत आहे. भविष्यात या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा, मेंदूचा विकार असलेल्या रुग्णांना फायदा होणार आहे.