जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्फत आवास दिन व आवास मास साजरा

.


लातूर,...... ‘सर्वांसाठी घरे 2022’ या अत्यंत महत्वाकांक्षी योजने अंतर्गत जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2020 रोजी आवास दिन साजरा करण्यात आला. तसेच 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2020 दरम्यान “आवासमास” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला त्यामध्ये सप्त सूत्रीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आला. त्यात प्रत्यक्ष लाभार्थीची गृहभेट व प्रोत्साहन देणे, लाभार्थीच्या अडचणीचे निराकरण करणे व मार्गदर्शन करणे, लाभार्थीला अनुदान वेळेत दिले जाते याचे निरीक्षण करणे, प्रत्येक ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक यांनी घरकुल डायरी जतन करणे व उत्कृष्ट काम करणारे अधिकारी/कर्मचारी यांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करणे, पात्र लाभार्थीना जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, संपर्क अधिकारी (खाते प्रमुख) व ग्राम सेवक यांची दरमहा आढावा बैठक घेणे, गट विकास अधिकारी यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची लाभार्थी निहाय साप्ताहिक आढावा बैठक घेणे अशा बाबींचा समावेश करण्यात आला.


 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2020 या दरम्यान साजरा करण्यात आलेल्या “आवास मास” मध्ये एकूण 317 इतक्या नवीन घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले, तसेच पूर्ण झालेल्या 1183 इतक्या घरकुलांचा गृहप्रवेश साजरा करण्यात आले व आवास मास दरम्यान 333 घरकुले पूर्ण झालेली आहेत. तसेच उर्वरित कामे जे अर्धवट आहेत ते पूर्ण करावे तसेच नवीन कामे तत्काल सुरू करण्यात यावेत अन्यथा अशी कामे रद्द करण्यात येतील असे आवाहन करण्यात येत आहे. ‘सर्वांसाठी घरे 2022’ही योजना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची अत्यंत महत्वाची व प्राधान्याची योजना असून सदरील कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत असे आवाहन करण्यात येत आहे. प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी सदरील कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन केले असून यशस्वी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.व प्रत्यक्ष घरकुलांच्या कामांना भेटी देऊन कामांची पाहणी व लाभार्थ्यांशी श्री.जोशी यांनी संवाद साधला.