*जिल्हा परिषद कर्मचारी वेतनातून ३०% पगार आई वडीलांच्या खात्यात जमा करण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत.*

.


लातूर........ 


लातूर जिल्हा परिषदेने वृद्ध आई-वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ३०% पगारकपात करुन ती रक्कम आई-वडीलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आई-वडीलांच्या खात्यात ती रक्कम जमा करण्यात येणार आहे.असे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ लातूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाअध्यक्ष महादेव खळुरे यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. 


 


अनेक शिक्षक बांधव पालकांचा वृद्धापकाळात सांभाळ करत नाहीत. अनेकजण आपण चर्चेतून, वृत्तपत्रातून,व कोर्टाच्या केस मधून पाहिले किंवा ऐकलेले आहेतच. बरेच नोकरदार कुटुंब वृद्ध आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवण्याची धाडसीने निर्णय घेतात.असे होऊ नये म्हणून त्यातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी कौतुकास्पद तोडगा काढला आहे.


नुकतेच दिल्ली येथिल न्यायालयात एका मुलानं आणि त्याच्या पत्नीनं मुलाच्या आई-वडिलांविरुद्ध खटला दाखल केला होता. परंतु, या खटल्याचा निकाल त्याच्या आई-वडिलांच्या बाजुने लागला. 


आई-वडिलांच्या घरात राहण्याचा आपल्याला 'अधिकार' आहे... आणि म्हणून त्यांच्या घराचा एका मजल्यावर आपला 'हक्क' आहे, असं मुलाचं म्हणणं न्यायालयानं साफ धुडकावून लावलं होतं


    या निर्णायक न्यायव्यवस्थेचे निर्णय सर्व आई-वडीलांना न्याय मिळवून दिले आहे.


    आपल्या घरी आईवडीलांचे वास्तव्य म्हणजेच साक्षात ईश्वरांचे वास्तव्य असते.पण काही नोकरदार बांधव आपल्या आईवडीलांचा सांभाळ करण्यात असमर्थ ठरतात. अहमदपूर येथिल टागोर शिक्षण संस्थेचे सचिव दलितमित्र,शिक्षणमहर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या संस्थेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारामधून आई-वडीलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतात.हा निर्णय लोहारे सरांनी दहा वर्षापूर्वी घेतला होता.आजही दरमहा पगारातून पैसे कपात केले जातात.असे अनेक भावनिक निर्णय घेणारे थोर व्यक्ती लातूर जिल्हाच्या मातीत जन्माला आलेले आहेत.नक्कीच अशा निर्णयाचे संबंध देशात कौतुकचं होणार !


     वरील निर्णय घेतल्याबद्दल कलाशिक्षक महासंघाचे लातूर जिल्हाअध्यक्ष महादेव खळुरे,जयप्रकाश हाराळे,तुकाराम देवकत्ते,पुरुषोत्तम काळे,लक्ष्मण गुडेवार,संभाजी भोपे,हाणमंत हेळगीरे,दिपक हालकंचे, सतीश बैकरे,नागनाथ स्वामी,विवेकानंद मठपती,मोहन तेलंग,प्रदिप माने,जनार्धन फुले,संतोष डावळे,अमृत तिडके,राजकुमार पवार,दिलीप घोडके,महादेव शिरसाठ,सौ.रेखा जाधव ,माधव वागलगावे,दिपक हालकंचे,मारोती जाधव आदिनी निर्णयाचे स्वागत केले.