दत्तगुरु इंग्लिश स्कुलच्या श्लोक निजवंतेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

.


उदगीर 


        येथील नामवंत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या दत्तगुरु इंग्लिश स्कुलचा कु.श्लोक राजीव निजवंते हा विद्यार्थ्यी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 204 गुण घेऊन शिष्यवृत्ती धारक झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजकुमार ममदापुरे, सचिव आशा ममदापुरे, मुख्याध्यापक ज्ञानोबा घोगरे, मुख्याध्यापक सचिन पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी त्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील इतर 13 विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.