स्व. दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या जयंती निमित्त "बेघर व्यक्तिंना दिवाळी फराळ वाटप"

.


उदगीर..... भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शाळेची नाळ समाजाशी घट्ट जोडून ठेवत आहे. 2020-21 ,हे वर्ष स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे .पाश्चिमात्यांचे अंधानुकरण झुगारून भारतीय विचार पुढे आणण्यासाठी व स्वदेशी रुजविण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य खर्ची घातले.'संवेदन-समरसता- संघटन' या त्रिसूत्रीचा अवलंब करत लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाने बेघर व गरजुंसाठी "दिवाळी फराळ वाटप" हा उपक्रम राबविला.


          गरजु,वंचित व ज्या व्यक्तींना घर नाही,कुटुंब नाही अशा बेघर व्यक्तिंना दिवाळी फराळाचे 'साठ'(60) किटचे वाटप केले. नगर परिषद उदगीर ,'दिनदयाळ अंत्योदय -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत'--"आधार" या शहरी बेघर निवारा केंद्र,उदगीर या ठिकाणी,शिवार महादेव परिसर,रेल्वेस्थानक परिसर,लातूर रोड उड्डानपुल परिसर,या ठिकाणी गरजूंना फराळाच्या साहित्याचे किट देवुन,त्यांचीही दिवाळी गोड करुन,त्यांच्या चेहर्यावर हास्य फुलविण्याचे कार्य केले.


              शंकरराव लासुने(कार्यवाह,स्थानिक समन्वय समिती,उदगीर),मधुकरराव वट्टमवार(अध्यक्ष,स्थानिक समन्वय समिती,उदगीर),षण्मुखानंद मठपती(अध्यक्ष, स्वामी विवेकानंद वसतीगृह समिती उदगीर) प्रदीप कुलकर्णी (मुख्याध्यापक, लाल बहादुर शास्त्री मा. विद्यालय, उदगीर ) लालासाहेब गुळभिले (पर्यवेक्षक), अंबुताई दीक्षित (पर्यवेक्षक), निता मोरे (गटपट रचना प्रमुख व दिवाळी फराळ वाटप उपक्रमाच्या प्रमुख),श्रीपाद सिमंतकर( प्राचार्य रामकृष्ण सीबीएसई स्कूल उदगीर ),सुनील वट्टमवार (शिक्षक-पालक संघ), मनोज भंडे (फराळ किट बनविणे प्रमुख )यांच्या हस्ते कीट चे वाटप करण्यात आले .


          या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय दीक्षित ,रामेश्वर मलशेट्टे,लक्ष्मी चव्हाण, रागिनी बर्दापूरकर ,आरती तेलंग ,एकनाथ राऊत,माधव मठवाले, विठ्ठल पस्तापुरे ,अनिता मुळखेडे, छाया दिक्कतवार,नीता मोरे, मनोज भंडे यांनी परिश्रम घेतले.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत