पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाच दिवसीय आनलाईन “फायदेशीर म्हैसपालन व्यवसाय” प्रशिक्षणाचे समारोप

.


उदगीर....... महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ उपकेंद्र व कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर यांचे मार्फत पशुपालकांकरिता ५ दिवसीय आनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम फायदेशीर म्हैसपालन व्यवसाय या विषयावर दि. ०२ ते ०६ नोव्हेंबर,२०२० दरम्यान आयोजित केले होते. या आनलाईन प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ४५ प्रशिक्षणार्थानी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणाचे आयोजन मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर आर.मुगळे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या समारोपाच्या अध्यक्षपदी महाविद्यालायचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.झेड.गायकवाड उपस्थित होते तसेच मा. सहयोगी अधिष्ठाता यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात पशुपालकांना सांगितले कि भारत देशात एकून दुध उत्पादनाच्या ५० टक्यापेक्षा जास्त दुधाचे उत्पादन फक्त म्हशीपासून मिळत आहे आणि तसेच शेतकामासाठी सुद्धा म्हशींचा उपयोग केला जातो. म्हशींचा काटकसरपना] सहज समरस व उत्पादनक्षम पाळीव प्राणी या गुणधर्मामुळे भारतीय व आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचे लक्ष सध्या म्हशीची उत्पादकता वाढविण्याकडे लागले आहे. तसेच प्रशिक्षणार्थींणी या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घेऊन व्यवसायात यशस्वी व्हावे व इतरांना म्हैसपालनाचे महत्व सांगावे असेही आवाहन केले. या प्रशिक्षणात डॉ.संदीप ढेंगे यांनी म्हैसपालनाचे महत्व व त्यांचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले, डॉ.विलास डोंगरे यांनी भारतातील दुधाळ म्हशींच्या जाती आणि त्यांची निवड कशी करावी इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले, डॉ.जी आर.चन्ना यांनी म्हशींचा निवारा व्यवस्थापन या विषयावर आपले मत मांडले, डॉ.शरद दुर्गे यांनी म्हशींचे शरीर पोषण आणि त्यांची घ्यावयाची काळजी या विषयाचे महत्वपर मत विषद केले, डॉ.गिरीश पंचभाई , स्नातकोत्तर पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी म्हशींचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन या विषयावर पशुपालकांना मार्गदर्शन केले, डॉ.रवींद्र जाधव यांनी म्हशींना होणारे विविध आजार आणि रोग्प्रतीबंधात्मक उपाययोजना याबद्दल पशुपालकांना जागृत केले, डॉ.मंगेश वैद्य यांनी म्हशींच्या पारडांचे संगोपन आणि पोषण या बद्दल मार्गदर्शन केले, डॉ.स्नेहल रामटेके म्हशींचे प्रजनन व्यवस्थापन आणि प्रजनन काळात गाभण म्हसीची घ्यावयाची काळजी या बद्दल जागरूकपर मार्गदर्शन केले, डॉ.विवेक खंडाईत यांनी वैरण व्यवस्थापन चार्याची लागवळ तसेच विविध चार्याचे महत्व पशुपालकांना पटवून दिले, डॉ. सत्यवान आगिवले पशुप्रथ्मोपचार व लसीकरण व इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले., डॉ.विलास वैद्य, मुंबई पशुवैद्कीय महाविद्यालय मुंबई, यांनी स्वच्छ दुध निर्मिती आणि दुधाचे गुण नियंत्रण या विषयासंबंधी पशुपालकांना दुधाचे महत्व तसेच दुध काढतांनी घ्यावयाची काळजी याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले, डॉ.श्रीधर शिराळे यांनी म्हशीमधील परजीवी रोग नियंत्रनाचे महत्व पटवून दिले, डॉ. नरेश सेलोकर शास्त्रज्ञ, केंद्रीय म्हैस संशोधन संस्था हिसार, हरियाना यांनी नव तंत्रज्ञानाने म्हशींचे प्रजोत्पादन या विषयावर पशुपालकांना संबोधित केले तसेच विविध प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल पशुपालकांना मार्गदर्शन केले. डॉ.नरेंद्र खोडे यांनी म्हैसपालनाचे अर्थशास्त्र व विपणन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यानी विविध प्रकारचे प्रश्न विचारले आणि तज्ञ व्याख्यात्यांनी त्यांच्या प्रश्नाचे योग्य निराकरण केले. या प्रशिक्षनाच्या यशस्वितेसाठी. डॉ. विवेक खंडाईत, डॉ.मंगेश वैद्य, डॉ संदीप ढेंगे व डॉ विलास डोंगरे प्रशिक्षण समन्वयक म्हणून कार्य केले.