लातुर जिल्ह्यात ५४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

.


उदगीर/प्रतिनिधी


 


दिपावलीच्या उत्सवानंतर जिल्ह्यात कोरोना डोके वर काढत असुन आज दि. २३ नोव्हेंबर रोजी आलेल्या अहवालात फक्त ५४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले यात उदगीर तालुक्यात १७ रुग्णांचा समावेश आहे. तर उपचारादरम्यान पाच जनांचा मृत्यू झाला असुन आजघडीला २८१ रुग्ण उपचार घेत आहेत.


     देशातील काही भागात दुसरी लाट येवू शकते असा अंदाज व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असुन आज नवीपासून पुढील वर्ग सुरू झाले आहेत. आज आलेल्या अहवालात ५४ रुग्ण सापडले आजपर्यंत २१३२६ रुग्ण सापडले त्यांच्यावर उपचार केल्यानंतर २०४०२ रुग्ण बरे होवू घरी गेले आहेत. सध्या २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान आज पाचजन दगावले आहेत.


    राज्य सरकारने खबरदार म्हणून दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह असने बंदन कारक केले आहे. दिवाळी सणा नंतर राज्यात कोरोना साथ हळूहळू पसरत असून राज्यसरकार काही भागात पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे.