*प्रवाहा सोबत माझ्या शिक्षकांनी घडवलेला सकारात्मक दृष्टीकोन*

.


साक्षर हमे बनाते है |


जीवन क्या है समझाते है,


जब गिरते है हम हार कर तो साहस वही बढाते है, ऐसे महान *शिक्षक* ही गुरु केहलाते है.....


सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय विशेष अभ्यास कक्ष , सेमी विभागामध्ये प्रथम सत्र परिक्षा नियोजनबद्ध व शिस्तबद्ध ऑनलाइन गुगल अॅप घेण्यात आल्या. 


शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा


ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा


कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ तर कधी पाठीवरील शब्बासकीचा हात, कधी कौतुकाचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा मार.


शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती,


संकट काळात धैर्य देणारी स्फुर्ती.


चारित्र्य पूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार.


जादूची *छडी* जी करते विद्यार्थ्यांची स्वप्न साकार.


"शिक्षक म्हणजे सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार.


दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार,


अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी तलवार,


अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार असे हे शिक्षकांचे आजन्म न फिटणारे उपकार."


कोरोना काळाची पार्श्वभूमी आपणा सगळ्यांना माहितीच आहे यानुसार मी आज आपणा समोर या दरम्यान मी व माझा शिक्षक म्हणून माझी , माझ्या सहकार्याची व माझ्या शाळेची थोडक्यात भूमिका मांडणार आहे. तुम्हाला माहित आहेच , आलेल्या संकटावर मात करून शिक्षक वर्ग अतिशय तळमळीने , जिद्दीने व प्रामाणिकपणाने प्रथम सत्र अभ्यासक्रम पूर्ण करून, प्रथम सत्र परीक्षा ही यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आहेत.


15 जुलैपासून आजपर्यंत आमचे ऑनलाईन क्लास हे व्यवस्थित रित्या चालत आहेत.


खरंतर कोरोना काळामध्ये मुलांचं काय होणार , शाळेचं काय होणार ही चिंता सतत मला व माझ्या सर्व शिक्षकांना भेडसावत होती.


असे असताना माझ्या सर्व शिक्षक वृंदानी पुढाकार घेऊन ऑनलाइन क्लास घेण्याची सुरुवात केली.


सुरुवातीला सर्व वर्गाचे पालक मेळावे घेऊन पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या व पालकांच्या सहमतीने ऑनलाइन क्लासला सुरुवात केली.


सर्व ऑनलाइन वर्गाच्या वेळेचे नियोजन करून विद्यार्थ्यांपर्यंत व्हाट्सअप द्वारे सांगण्यात आले.


त्यानुसार पाचवी सहावी सातवी सकाळी सात ते 11:40 या वेळामध्ये तिन्ही वर्गाचे क्लास पूर्ण होत होते.


साडेदहा ते एक या वेळामध्ये चौथी या वर्गाचा ऑनलाईन क्लास घेतला जात होता.


साडेबारा ते 3 या वेळामध्ये तिसरीच्या वर्गाचा ऑनलाईन क्लास घेतला जात होता.


तसेच एक ते तीन या वेळामध्ये दुसरीचा वर्ग ऑनलाईन क्लास घेतला जात होता.


सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इयत्ता पहिली या वर्गाचा ऑनलाईन क्लास अतिशय सुंदर रित्या आमच्या विशेष अभ्यास कक्षातील *नीता गडीकर* बाईंनी खूप छान प्रकारे घेतलेला आहे.


सुरुवातीला पहिलीचा ऑनलाईन क्लास घेत असताना सर्व पालकांना या सगळ्या गोष्टीचं सखोल प्रशिक्षण देण्यात आला. त्यानंतर पालकांनी आपापल्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टीची जाणीव करून दिली व 30 जुलै पासून पहिली या वर्गाचे ऑनलाईन क्लास सुरळीत चालत आहेत.


 खरंतर या ऑनलाइन द्वारे विद्यार्थ्यांचा 100% विकास हा नक्कीच झालेला नाही.


परंतु पूर्णपणे अभ्यासापासून वंचित राहण्यापेक्षा किमान 50 टक्के विद्यार्थ्यांनी तरी या ऑनलाइन द्वारे ज्ञान ग्रहण केले आहे.


तसेच वर्षभरामध्ये येणारे सर्व दिनविशेष जयंत्या-पुण्यतिथ्या तसेच विशेष कार्यक्रम आषाढी दिंडी, गोपाळकाला, नवरात्र महोत्सव ,गणपती उत्सव असे अनेक कार्यक्रम हे ऑनलाईन द्वारेच सर्व वर्गातील शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून करून घेतलेला आहे.


या ऑनलाईन कार्यक्रम घेत असताना एक फायदा निश्चित झालेला आहे बाहेर गावच्या तज्ज्ञ मंडळींना प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ता म्हणून बोलवताना खूप सोपं झालं.


कारण त्यांच्या घरी बसून सुद्धा ती मंडळी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कला आविष्कार पाहत होती. व या जेष्ठ मंडळींचं मोलाचे मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना मिळाले.


शाळा जरी ऑनलाइन द्वारे दोन किंवा तीन तास घेण्यात आली असली तरीही शिक्षकांना किमान आठ तास हा पूर्णवेळ त्यांची डुटी करावी लागत होती.


दोन तास ऑनलाईन क्लास शिकवणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे गृहपाठ तपासावे लागत होते आणि विद्यार्थ्याला गृहपाठ पाठवणे , गणित पाठवणे , त्यांचे गृहपाठ तपासणे असे अनेक काम करत असताना शिक्षकांचा वेळ हा कसा जात होता हे त्यांनाच कळत नव्हते.


*फुल ना फुलाची* पाकळी म्हणतात ना अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना covid-19 च्या काळात शिक्षणापासून वंचित ठेवण्यापेक्षा कुठेतरी त्यांना ऑनलाइन द्वारे जोडून त्यांचा बौद्धिक विकास करण्याचं कार्य माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी अगदी मनापासून केलेला आहे.


सर्व विद्यार्थी शिक्षकांना दररोज ऑनलाइन द्वारे पाहू शकत होते, त्यांच्याशी गप्पा मारू शकत होते, त्यांच्याशी बोलू शकत होते.


बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की ऑनलाइन शिक्षण कुठे शिक्षण असतं का ....


पण मी नक्कीच म्हणेल शंभर टक्के विकास काही होत नाही पण.. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना या शिक्षण प्रवाहात ओढण्याचे माध्यम म्हणून आपण ऑनलाइन द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा मानस केलेला आहे.


ऑनलाइन शिक्षण देत असताना माझ्या सर्व शिक्षकांना अनेक अडचणी आल्या अनेक प्रश्न निर्माण झाले तरीही ही माझे शिक्षक न डगमगता , न घाबरता या स्पर्धेच्या युगामध्ये खंबीरपणे पाय रोवून आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानदान देण्याचं कार्य हे त्यांनी केलेले आहे.


तसेच सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन द्वारे बऱ्यापैकी शिक्षण घेण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक वर्गाची शंभर टक्के उपस्थिती नक्कीच नव्हती.


कारण बऱ्याच पालकांकडे मोबाईलची कमतरता असल्यामुळे किमान पन्नास टक्के विद्यार्थी हे या शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत.


निश्चितच या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर यांची पूर्ण तयारी करून घेण्याचे आम्ही ठरवलेला आहे.


ऑनलाईन प्रशिक्षण देत असताना आम्हाला सर्व पालकांचे खूप खूप मोलाचे सहकार्य लाभलेला आहे.


माझ्या शाळेतील सर्व वर्गशिक्षिका .नीता, गडीकर, माया होनराव, प्रतिभा विश्वनाथे, मंगल वाडकर, भाग्यश्री पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील, वृक्षाला जाधव, सारिका शिंदे, बालाजी रोडे, मंगल पकोले, सुजाता महाजन, अर्चना सोलापुरे.


या सर्व शिक्षकांनी अतिशय मोलाची कामगिरी या काळामध्ये केलेली आहे म्हणून मला माझ्या शिक्षिका बद्दल इथं असं म्हणावसं वाटते. 


"इतुकेच अंगी यावे बळ फक्त


खडूतून रक्त उतरावे


उतरावे आणि देह व्हावा मुग्ध


खडूतुन दुग्ध स्त्रवतना"


या ओळीप्रमाणे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना खडू रूपी दुधाने मुग्ध करावे हीच इच्छा ईश्वरचरणी बाळगते व पुढील काळामध्ये या रोगावर मात करून लवकरच शाळा सुरू व्हावे ही इच्छा व्यक्त करते . तसेच सर्वांना शुभ दीपावली धन्यवाद...🙏


.


*आशा वसंतराव बेंजरगे*


सरदार वल्लभाई पटेल , विशेष अभ्यास कक्ष , सेमी विभाग प्रमुख, उदगीर. 


*8329258770*