उदगीर येथील प्रयोगशील कारवाँ वाचन कट्ट्यास उदगीर नगर परिषद चे मुख्याधिकरी भारत राठोड यांची भेट

.


उदगीर :- उदगीर नगर परिषद चे मुख्याधिकरी भरत राठोड यांनी उदगीर येथील कारवाँ फाउंडेशन अंतर्गत प्रयोगशील अश्या कारवां वाचन कट्टयास भेट दिली.उदगीर येथील कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी परिसरात एक अभिनव असा वाचन कट्टा सर्व तरुणांनी मिळून सुरू केला.निसर्गरम्य अश्या वातावरणात एक विशाल वृक्षाच्या छायेत हा वाचन कट्टा सुरू केला असून या ठिकाणी भिंती विरहित एक अभिनव वाचनालय जिथे कुणीही आपल्या आवडीचे पुस्तकाचा आनंद घेऊ शकतो.आपल्या ठेवणी मधील वाचन झालेली असंख्य पुस्तके तशीच अडगळीत पडून असतात, अश्या पुस्तकांना आपण या वाचन कट्टा येथे देण्याचे आवाहन कारवाँ फाउंडेशन च्या वतीने ॲड अदिती पाटील कवळखेडकर यांनी केले.या भेटी दरम्यान भरत राठोड यांनी अभिनव कल्पनेचे कौतुक केले व तरुणाई ने या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.उदगीर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या विविध उद्यानामध्ये या प्रयोगाची पुनरावृत्ती करणार असल्याचे यावेळी नमूद केले.पुस्तकाची देवाण घेवाण केली तरच त्या पुस्तकाला खरा न्याय मिळतो व त्या पुस्तकाच्या लेखकाला अभिप्रेत संदेश सर्व दूर पोहचतो असे प्रतिपादन या वेळी उदगीरचे साहित्यिक तथा शिक्षक धनंजय गुडसुरकर यांनी व्यक्त केले.यावेळी ओमकार गांजूरे, डॉ. मनोहर सूर्यवंशी,अमोल घुमाडे,सुनील भुयारे,संदीप देशमुख,प्रमोद कळोजी,सौ राठोड,युवराज कांडगिरे व इतर सदस्य उपस्थित होते.