*लातूर शहरातील मतदान केंद्राची जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्याकडून पाहणी*

.*जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर covid-19 अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी 


  अंमलबजावणी*


*जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत पणे पार पडली*


*जिल्ह्यात सरासरी 66.11 टक्के मतदान, मतदारांचा मतदानाला उस्फूर्त प्रतिसाद*


*जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्याकडून केशवराज विद्यालयातील मतदान केंद्रावरील सर्व सोयी   


  सुविधांची पाहणी*



लातूर,...... भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 05- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी लातूर जिल्ह्यातील 88 मतदान केंद्रावर आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरुवात होऊन सर्व मतदान प्रक्रिया शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पडली. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी लातूर शहरातील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील सोयी सुविधांची पाहणी करून कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेची प्रभावी अमलबजावणी होत आहे की नाही याबाबतची खातरजमा केली. व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या.


      जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी आज सकाळी केशवराज विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 478, 479 व 480 येथील सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच येथील मतदान केंद्रावर महिला मतदार यासाठी स्वतंत्र रांग तयार करण्यात येऊन ज्येष्ठ मतदारांसाठी ही मतदानासाठी स्वतंत्र रांग करण्यात आली. तसेच येथील मतदान केंद्र क्रमांक 480 वर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी उपस्थित होते हे सर्व मतदार कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत होते. त्या मतदान केंद्रावर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी आल्याने व मतदान करताना वेळ लागत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी स्वतः बेंच टाकण्याची व्यवस्था करून त्याठिकाणी मतदारांना बसण्याची व्यवस्था केल्याने मतदारही समाधानी झाले. जिल्ह्यातील इतर मतदान केंद्रावर ही आवश्यकतेप्रमाणे तेथील झोनल अधिकारी यांनी मतदारांना बसण्याची व्यवस्था करावी असेही त्यांनी निर्देशित केले.


    .


लातूर जिल्ह्यातील 88 मतदान केंद्रावर आज सकाळी आठ वाजल्यापासून पदवीधर निवडणुकीसाठीच्या मतदानाला शांततेत सुरुवात झाली. संपूर्ण दिवसभरात ही निवडणूक अत्यंत शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पडली. यावेळी लातूर जिल्ह्यातील मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसून येत होत्या तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा निवडणूक प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमाने covid-19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत होत्या व मतदान केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे थर्मल गन द्वारे तपासणी करूनच हाताला सॅनिटाईज करूनच मतदान केंद्रात सोडले जात होते. ही निवडणूक कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात होणारी महाराष्ट्र राज्यातील पहिलीच मोठी निवडणूक असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने उपायोजना अत्यंत चोखपणे राबविल्या होत्या.


    *औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील 88 मतदान केंद्रावर 41 हजार 190 मतदार मतदानाचा हक्क बजावतील या दृष्टीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या होत्या. सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत मिळालेल्या अंदाजित आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 27 हजार 230 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता. मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या 22 हजार 380 इतकी असून महिला मतदारांची संख्या 4 हजार 849 इतकी असून इतर एका मतदाराने मतदान केले. लातूर जिल्ह्यात सरासरी 66.11 इतके टक्के मतदान झालेले आहे.*


 .


लातूर जिल्ह्यात ही मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व पथकांचे नोडल अधिकारी, पोलिंग ऑफिसर, निवडणूक कामात सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत जबाबदारीने कामकाज केले.