लातूर,.... नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत सन 2020-21 करिता लातूर उपविभागात सुक्ष्मनियोजन ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी सुक्ष्मनियोजन समन्वयकाचे 3-4 महिण्याच्या कालावधीसाठी (2 समन्वयकाचे ) पॅनल तयार करावयाचे आहे. पूढील पात्रता पुर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, सर्व शैक्षणिक अर्हता दर्शवणारी मुळ कागदपत्रे, आधारकार्डची झेरॉक्स, 1 पासपोर्ट साईज फोटो व सर्व कागदपत्रांच्या 1 स्वसाक्षांकीत झेरॉक्स प्रतिसह दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी स्वखर्चाने मुलाखतीस हजर रहावे असे उपविभागीय कृषि अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
मुलाखतीची नोंदणी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत प्रकल्प संचालक (आत्मा) मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, लातूर येथे होईल व नंतर लागलीच मुलाखती घेण्यात येतील.इच्छुक उमेदवारांनी वेळेत हजर राहुन नोंदणी करावी. पॅनेलमधील सुक्ष्मनियोजन समन्वयकांना प्रकल्पाच्या गरजेनुसार/ आवश्यकतेनुसार लातूर विभागात कोठेही काम दिले जाईल.
शैक्षणिक पात्रता पूढील प्रमाणे राहील. उपविभागामध्ये कार्यरत सात समुह सहाय्य्का करिता एक सुक्ष्मनियोजन समन्वयक अशा प्रकारे सुक्ष्मनियोजन समन्वयक चमु तयार करण्यात येणार आहे. कोणत्याही शाखेची पदवी (कृषि/ समाजशास्त्र/ समाजकार्य/ संवादशास्त्र विषयातील पदवी वा तत्सम विषयातील पदवी) धारण केलेली असावी, महिलांना प्राधान्य देण्यात येईल, सुक्ष्मनियोजन प्रक्रिया कालावधीमध्ये पुर्ण वेळ काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे, शासकीय योजने अंतर्गत गाव/ पाणलोट नियोजन विषयक काम केल्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल व इच्छुक व्यक्तींना संगणकाचे ज्ञान, संवाद कौशल्य, तसेच अनुभव असणे आवश्क आहे.
****