गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आणू पाहणाऱ्या राशन दुकानदार व पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करा - सुशीलकुमार शिंदे*

.


उदगीर.... लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील राशनच्या मालाची राशन दुकानदारांनी परस्पर विक्री करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आणू पाहत आहेत तरी अशा भ्रष्ट राशन दुकानदार व पुरवठा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशा मागणीचे निवेदन रि. पा. इं. (आ) युवक आघाडीचे सुशीलकुमार शिंदे यांनी तहसीलदार उदगीर यांना दिले आहे


   भारत सरकारने या महामारी मध्ये एकही व्यक्ती उपासमारीने मरू नये यासाठी मोफत धान्य देण्यासाठी संपूर्ण राज्य शासनाला आदेश देऊन गोरगरीब जनतेपर्यंत धान्य पोहचविण्याचे काम संबंधित तहसील कार्यालय यांच्या कडे सोपविले आहे पण आज पाहता लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील राशन दुकानदाराने राशनच्या मालाची विक्री सर्रासपणे काळ्या बाजारात केली आहे 


     स्वस्त धान्य दुकानदाराला शासकीय गोदमातून मिळणारे तांदूळ,गहू,डाळ, हे सदरील दुकानदार हा लाभार्थ्यांना वाटप न करता शेकडो क्विंटल धान्य पुरवठा विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने स्वतःचे अंगठे लावून सदरील माल परस्पर काळ्या बाजारात विक्री करून मोठा भ्रष्टाचार केला आहे 


       आणि झोपी गेलेल्या राहशील प्रशासनाने आता राशन दुकानदाराच्या अंगावर धान्य शिल्लक काढून त्या दुकानदाराला धान्य न निंर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आज गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ संबंधित राशन दुकानदार आणू पाहत आहेत तरी अशा भ्रष्ट दुकानदारांचे परवाने रद्द करून संबंधित पुरवठा विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी रि.पा.इं.(आ) युवक आघाडीचे सुशीलकुमार शिंदे यांनी तहसीलदार उदगीर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे