एक उत्कृष्ट समाज शिक्षक: प्रा.गोपालकृष्ण घोडके

.


आपल्या वक्तृत्वाने एक काळ राज्यभर उत्कृष्ट वक्ता म्हणून लौकिक मिळविणारे व कोणतेही गणित क्षणात सोडविणारे गणित तज्ञ प्रा. गोपालकृष्ण घोडके हे उदयगिरी अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवीत आहेत.आपल्या वक्तृत्वाने माणसाच्या मनाचा ठाव घेणारे ,माणसाचे गणित करीत अधिकाधिक माणसं जोडणारे प्रा. गोपालकृष्ण घोडके यांनी राजकारण ,समाजकारण,शिक्षण क्षेत्रात कमी काळात अधिक उल्लेखनीय कार्य केले .आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...


    प्रा.गोपालकृष्ण दत्तात्रय घोडके यांचा जन्म दि.2 डिसेंम्बर 1974 रोजी गुंडोपंत दापका ता.मुखेड जि. नांदेड येथे एक सधन शेतकरी कुटुंबात झाला.त्यांचे शिक्षण एम.एस्सी.बी.एड.पर्यंतचे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होत असत.वादविवाद ,वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळविले.त्याकाळात त्यांचे आकाशवाणीवर भाषण प्रसारीत झाले.शिक्षण संपल्यावर त्यांनी काही काळ एका खाजगी शाळेवर प्राचार्य म्हणून काम पाहिले.त्यानंतरच्या काळात राजकारण, समाजकारण व शिक्षण क्षेत्रातही महत्वपूर्ण कार्य सुरू केले.राजकारणात जळकोट तालुका रोहयो चे चेअरमन राहिले.कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे संचालक व कै. विलास भोसले मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले.त्यानंतर सर शिक्षण क्षेत्राकडे वळले.शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदगीर शहरात गुढीपाडवा च्या मुहूर्तावर 2011 मध्ये त्यांनी उदयगिरी अकॅडमी ची सुरुवात केली.या अकॅडमीमध्ये शिस्त,संस्कार आणि शिक्षणाचे धडे दिले जातात.यात शिक्षणाबरोबरच विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शन केले जातात.गेल्या काही वर्षात या अकॅडमी चा गुणवतेचा आलेख वाढला आहे. दहावी,बारावी परीक्षेत अनेक विध्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण घेतले.अनेक विध्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून स्वावलंबी बनले.काही विध्यार्थ्यांनी एम.पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवून मोठ्या पदावर पोहोचले. भविष्यात उदगीर मधील जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घडवायचे आहेत.त्यांचे संकल्प यशस्वी होवोत ही सदिच्छा.त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया!


        


       शंकर बोईनवाड


       संपादक


     शालेय संकल्प 


       उदगीर