क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमेचे चिकुरडा येथे उद्घाटन संपन्न

.


लातूर,..... चिकुरडा ता.लातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ.एकनाथ माले यांच्या हस्ते संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.


या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, डॉ.राहूल आनेराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक सारडा, प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मेंढेकर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोग मोहिमे दरम्यान प्रत्येक घरोघरी जावून तपासणी करण्याचे आवाहन केले. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या कुष्ठरोग शोध मोहिमेत भाग घ्यावा व लातूर जिल्हा हा क्षयरोग मुक्त व कुष्ठरोग मुक्त करण्याचे त्यांनी आवाहन केले.


या अभियानास डॉ.एकनाथ माले यांनी उपस्थित असणाऱ्या आरोग्य कर्मचारी, गावकरी व आशा वर्कर यांना या मोहिमेची सखोल माहिती दिली.समस्त आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ते लातुका स्तरापर्यंत या संयुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.