मतदार यादीचा संक्षीप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमासाठी विशेष मोहिम

लातूर,..... लातूर तालुक्यातील 234- लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील व 235- लातूर शहर विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिकांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम दिनांक 15 डिसेंबर 2020 पर्यत चालू असून या संदर्भात दिनांक 05 व 06 डिसेंबर 2020 रोजी व दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 या दिनांकास विशेष मोहिम स्वरुपात दावे व हरकती स्विकारण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


यामध्ये नविन नावे समाविष्ठ करणे. ज्यांचे नाव मतदार यादीत नाही अशा नागरीकांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करता येतील. मतदार यादीतील नावाची दुरुस्ती, नावांची वगळणी व ठिकाणात बदल याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. वरील नमुद दिनांकास लातूर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO हजर राहणार आहेत.


ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ करावयाचे आहे किंवा वगळावयाचे आहे किंवा दुरुस्ती करावयाचे आहे अशा नागरीकांनी याबाबत योग्य तो नमुना अर्ज (-6,7,8, 8-अ) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांचेकडून किंवा तहसिल कार्यालय लातूर निवडणूक विभागातुन प्राप्त करुन घेऊन जास्तीत जास्त मतदारांनी आपले नावे मतदार यादीत नोंदवावीत. असे आवाहन उपविभागीय अधिकारी, लातूर व तहसिलदार ,लातूर यांनी केलेले आहे.