*पी.टी.ए. च्या वतीने प्रा.गोपाळकृष्ण घोडके यांचा वाढदिवसानिमित्य व पी.टी.ए.च्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार संपन्न*

.


उदगीर...... 


          *पी.टी.ए चे राज्य उपाध्यक्ष तथा उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा.गोपाळकृष्ण घोडके सरांचा वाढदिवसा निमित्य व पी.टी.ए. च्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पी.टी.ए. उदगीरच्या वतीने शाल, गुलदस्ता व भेटवस्तू देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी प्रा.घोडके सरांवर शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव केला. या वाढदिवस समारंभास पी. टी. ए चे तालुका अध्यक्ष तथा बसव ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रा.सिध्देश्वर पटणे, पी.टी.ए.चे तालुका सचिव प्रा.प्रदीप वीरकपाळे, तालुका कार्याध्यक्ष प्रा.पांडुरंग फड, प्रा.सोमनाथ बिराजदार, डॉ.धनंजय पाटील, प्रा.संजय जामकर, प्रा.सचिन शिंदे, प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.संतोष पाटील, प्रा.संतोष चौधरी, प्रा.नंदकुमार पटणे, प्रा.पांडुरंग काजबा, प्रा.गजानन पाटील, प्रा.विवेक होळसांबरे, श्री.संदीप पाटील, श्री. चंद्रकांत काटवाटे, श्री.विकास दुपारे इत्यादी पी.टी.एचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.*