लातूर जिल्हा रिटेल केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोशियशनच्या अध्यक्षपदी रामविलास नावंदर तर सचिव पदी राजकुमार मोहनाळे

.


उदगीर.... :महाराष्ट्र राज्य रिटेल केमिस्ट अँड ड्रगी स्ट आसोसियषनचे संस्थापक अध्यक्ष सचिन भालेकर यांच्या हस्ते लातूर जिल्हा अध्यक्ष म्हणून रामबिलास नावंदर तर सचिव म्हणून राजकुमार मोहनाळे यांना नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. तर कोषाध्यक्ष म्हणून साबेरी लाईक अहमद व उदय श्रेनेवार ,लक्ष्मण बिरादार, ओमशंकर कलकोटे, अभिजीत येवणंगे यांची एक एक वर्षा साठी नियुक्ती पत्र देवून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या .


 बऱ्याच वर्षापासून रिटेल केमिस्ट संघटना निर्भीड पणे काम करून सामान्य केमिस्टनां न्याय देण्याचे काम करत आहे.सचिव राजकुमार मोहनाळे व अध्यक्ष राम बिलास नावंदर यांनी रिटेल केमिस्ट ना संघटणेच्या वतीने न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.