अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळातर्फे वृक्षारोपण

.


उदगीर/प्रतिनिधी


 


बापुसाहेब पाटील एकंबेकर विद्यालय उदगीर येथील कोषाध्यक्षा मृदुला पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळ तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.


     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव विजयकुमार पाटील हे होते. तर कार्यक्रमाचे आयोजक मित्र मंडळ अध्यक्ष अभिजीत औटे, संस्था प्राचार्य डॉ क्षीरसागर ओ एम, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा व मित्र मंडळ सचिव दिपाली औटे, जिल्हा सरचिटणीस हुसना बानु शेख, उरमीला वाघमारे, प्रा. डॉ. शिंदे अंनत डॉ म्हाळनकर बालाजी, जाधव दत्ता, पवार वसंत आदि मान्यवर उपस्थित होते.