उदगीर येथील सरदार पटेल विद्यालयात, सेमी विभागात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

.


उदगीर....... उदगीर येथील सरदार पटेल विद्यालयात नामे गणेश नारायण शेळके हा विद्यार्थी 212 गुण घेऊन शिष्यवृत्तीधारक झालेला आहे. यावेळी नुकताच त्याचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आलेला आहे.


या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय, उदगीर विशेष अभ्यास कक्ष सेमी विभागाती सर्व शिक्षकांनी त्याच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांच व त्याच्या पालकाच सत्कार व कौतुक नुकतेच केलेले आहे.


या विद्यार्थ्यांची लहानपणापासूनच खूप मेहनती, जिद्दी व चिकाटी आहे. हा विद्यार्थी आज्ञाधारक तर आहेच, व सर्वगुणसंपन्न ही आहे. तो प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबरवन अशी त्याची कामगिरी असते. अक्षर अतिशय सुंदर आहे. आज्ञाधारक, प्रेमळ, पण आहे. असे विविध गुण अंगी असणाऱ्या गणेशचे शाळेच्या वतीने त्याचे खूप खूप मनापासून कौतुक करण्यात आले.


गणेशच्या यशाच्या पाठीमाग त्याला शिकवलेले शिक्षक संदीप पाटील, प्रशांत पाटील, आशा बेंजरगे इत्यादी सरांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तसेच त्याची आई आणि वडील त्यांचे सुद्धा पण खूप मोठे योगदान आहे. 


गणेशच्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वृंद, संस्थापक, पदाधिकारी, मुख्याध्यापक यांनी गणेशचे खूप खूप कौतुक केलेले आहे.