तंत्रस्नेही शिक्षक काळाजी गरज*

 कोविड -१९ या विषाणूने जगभर थैमान घातले आहे यामुळे सारे जग ठप्प झाले आहे. या महामारीमुळे लाखो लोकांना प्राणास मुकावे लागले आहे. कोविड-१९ या विषाणूमुळे होणारे विविध समस्यांना आपण तोंड देत आहोत.

वर्क फ्रॉम होम आदेश निघाल्यापासून कधीही मोबाईलचा बोलण्या इतपत वापर करणारा शिक्षक अँनराँईड मोबाईल मधिल विविध साधनांचा वापर करुन कोरोना महामारीने सर्व शिक्षकांना तंत्रस्नेही बनविले आहेत.


मागिल काळात छोटा मोबाईल वापरणारे शिक्षक विद्यार्थीचा हीत समजून घेऊन आँनराँईड मोबाईल चे अद्यावत ज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांबाबतची तळमळ त्यांना शिकवण्याची तीव्र इच्छाशक्तीमुळे स्वतः तंत्रस्नेही बनण्याचा प्रयत्न केले आहे.व नवनवीन तंत्राच्या वापराने अध्यापन करीत आहेत.विविध प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित होऊन ही कला आत्मसात केली आहे.

आजचा शिक्षक 'शाळा बंद व शिक्षण सुरू' या शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन करीत झूम अँप,गुगल मीट ,व्हॉट्सॲप, गूगल क्लासरूम, दीक्षा ॲप ,ई-बालभारती,युट्युब वरील शैक्षणिक साहित्य वापरून विद्यार्थ्यांना आपापल्या विषयाचे सखोल ज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडविणारे केंद्र  म्हणजेच शाळा होय. शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर.येथे चालणारी शिक्षणप्रक्रिया यातून विद्यार्थी घडत असतो.

याच शाळेत विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने शिकविणारे शिक्षकांना आज या कोविड- १९च्यामहामारी मुळे पारंपारिक शिक्षण पद्धतीला काही बंधने येत आहेत. यातूनच तंत्रस्नेही शिक्षक म्हणून कार्य करताना दिसून येत आहेत .विविध तंत्राच्या सहाय्याने ऑनलाइन शिक्षण पद्धती अमलात आणली आहे. यामुळेच आजचा विद्यार्थी आपल्या घरातूनच ऑनलाइन पद्धतीने अध्ययन करीत आहे .मागील काळात शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर उभे राहू अध्यापन करत असे. पण आज या लाँकडॉऊन व सोशल डिस्टंसमुळे हे शक्य नाही. म्हणून ई लर्निंग ऑनलाईन टिचिंग चा वापर करून आजचा शिक्षक तंत्रस्नेही झाला आहे.

     मोबाईल, संगणक ,रेडिओ ,दूरदर्शन या ई-लर्निंगच्या साहित्यापासून  वेगळ्या पद्धतीचे एज्युकेशनल माहिती संकलित करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे पवित्र कार्य आजचा तंत्रस्नेही शिक्षक आपापल्या पद्धतीने करत आहे.


शाळेत विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने शिकविणारे शिक्षक आज  कोविड-१९ या महामारीमुळे पारंपारिक पद्धतीने शिक्षण देणे अशक्य आहे.आज शाळेत विद्यार्थ्यांना बोलावू शकत नाही.बोलावल्यास विद्यार्थी येऊ शकत नाहीत.सोशल डिस्टंस कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता,शाळा सुरुवात होण्याचे चिन्हे दिसून येत नाही. काही बंधने येत आहेत. यातूनच सर्वच शिक्षक आपापल्या पद्धतीने कार्य कररीत आहेत. विविध तंत्राच्या सहाय्याने ऑनलाइन शिक्षण पद्धती अमलात आली आहे. यामुळेच आजचा विद्यार्थी आपल्या घरातूनच ऑनलाइन पद्धतीने अध्ययन करीत आहे. मागील काळात शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर उभे राहू अध्यापन करत असे. पण आज या लाँकडॉऊन व सोशल डिस्टंसमुळे हे शक्य नाही. म्हणून ई लर्निंग ऑनलाईन टिचिंग चा वापर करून आज शिक्षक तंत्रस्नेही झाला आहे.

     मोबाईल,संगणक,रेडिओ,दूरदर्शन या ई-लर्निंगच्या साहित्यापासून वेगळ्या पद्धतीचे एज्युकेशनल माहिती संकलित करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे पवित्र कार्य आजचा तंत्रस्नेही शिक्षक आपापल्या पद्धतीने करत आहे. शिक्षण विभागाने दुरदर्शन वरुन टिलीमिली कार्यक्रमातून विविध वर्गातील वेळापत्रकाप्रमाणे अभ्यासक्रम दाखविले जात आहे.ज्या विद्यार्थ्यांकडे अँनराँईड मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांना टिव्ही, रेडिओवरुन अभ्यासक्रम पुर्ण करुन घेतला जात आहे.या संकट समयी आपला शिक्षक बांधव सोशल डिस्टंस नियमाचे पालन करुन आँफलाईन शिक्षण वाडी तांड्यावर जाऊन शिक्षण देत आहेत.

तंत्रस्नेही शिक्षकांमुळे विविध तंत्राच्या साह्याने निर्माण केलेले शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती आज देवदूतासारखे काम करीत आहेत.


*कोविड पासून करत सर्वांचे रक्षण,गुरुजी देत आँनलाईन शिक्षण!*


पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये वर्गात अध्यापन करीत असताना विद्यार्थी व शिक्षक यात आंतरक्रिया चालत असत.आंतरक्रिया घडवून येण्यासाठी ऑनलाईन अध्यापन पद्धतीत अडथळा निर्माण होत आहे.या पद्धतीत योग्य आंतरक्रिया होत नाही. विद्यार्थ्यांचे भावना समजून येत नाहीत. तरीही काळाची गरज ओळखून ई-लर्निंगच्या माध्यमातून तमाम शिक्षक बांधव आपापल्या पद्धतीने तंत्रस्नेही झाले आहेत. ज्ञानदानांचे पवित्र कार्य संकट काळात सुद्धा सुरळीत चालू आहे.अशा सर्व तंत्रस्नेही शिक्षक बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन!आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!



महादेव शरणप्पा खळुरे 

मो ८७९६६६५५५५