*श्री गुरु हावगीस्वामी यात्रा महोत्सवास २३ जानेवारीपासून प्रारंभ*

.


 *उदगीर (प्रतिनिधी) श्री गुरु हावगीस्वामी महाराज यात्रा महोत्सव २३ जानेवारी २०२१ पासून सप्तकोटी शिवपंचाक्षर महामंत्र जप यज्ञ, अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य ग्रंथाचे पारायणास प्रारंभ होत आहे.*


*उदगीरचे आराध्य दैवत श्री गुरु हावगीस्वामी महाराज यात्रा महोत्सव समितीच्या वतीने श्री गुरु हावगीस्वामी मठात मठसंस्थानचे मठाधिपती श्री.श्री.१०८ डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली* *शनिवार दिनांक २३ जानेवारी ते ३० जानेवारी २०२१ दरम्यान दररोज सप्त कोटी शिवपंचाक्षर महामंत्रजप यज्ञ, परमरहस्य ग्रंथाचे पारायण संपन्न होणार आहे.*


*दररोज पहाटे सहा ते चार श्री गुरु हावगीस्वामी महाराजांचा वीरभद्र स्वामी यांच्या हस्ते अभिषेक,पहाटे चार ते सहा शिवपाठ सात ते नऊ परमरहस्य ग्रंथाचे पारायण ९ ते १२ शिवपंचाक्षर जप, तीन ते चार गाथा भजन,चार ते पाच प्रवचन,सायंकाळी सहा ते सात शिवपाठ, रात्री नऊ ते अकरा शिवकीर्तन व शिवजागर आदी कार्यक्रम होणार आहेत.*

वीरशैव शिवकिर्तनकार मंडळाचे अध्यक्ष शि.भ.प. शिवराजप्पा नावंदे गुरुजी व शि.भ.प. तानाजी पाटील थोटवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन व प्रवचन सोहळा संपन्न होणार आहे. 

श्री गुरु हावगीस्वामी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचे पूजा पौराहित्य कार लातूर जिल्हा जंगम अर्चक मंडळ उदगीर हे करणार आहे. *शुक्रवार दि. २९ जानेवारी रोजी परमरहस्य ग्रंथ व सप्तकोटी शिव पंचाक्षर जपाची सांगता होऊन सकाळी ११ वाजता शहरातून भव्य कलश शोभायात्रा निघून दुपारी ठीक तीन वाजता मठामध्ये महामंगल आरती होणार आहे. रात्री दोन वाजता श्री ची पालखी मिरवणूक निघून शनिवार दि. ३० रोजी पहाटे ५ वाजता अग्गीचा कार्यक्रम व दिवसभर कुस्त्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.*


*कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियम व निर्देशाचे पालन करुन श्री गुरु हावगी यात्रा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहीती श्री गुरु हावगी स्वामी मठसंस्थानचे मठाधिश डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिली.*



*श्रीगुरु हावगी स्वामी महाराज यात्रा महोत्सव निमित्त आयोजित सत्संग कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री गुरु हावगीस्वामी मठ संस्थानचे मठाधिपती डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, बाबुराव समगे, रामलिंग स्वामी, शिवराज नावंदे ,सुभाष धनुरे, उद्धव महाराज हैबतपुरे, बसवराज कानमंदे, शिवराज पाटील यांच्यासह नगर सेविका श्रीमती रेखाताई मल्लिकार्जुन कानमंदे , वैजनाथ उप्परबावडे, राजकुमार संमगे, अशोक समगे, गिरीश उप्परबावडे, हावगीस्वामी युवक संघ, श्री हावगीस्वामी गणेश मंडळ, श्री हावगीस्वामी महिला भजनी मंडळ, महादेव भजनी मंडळ यांनी केले आहे.*