.
अहमदपूर .....
देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जिजामाता कन्या विद्यालय, देवळा
येथील कलाशिक्षक भारत पवार यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूद्वारे रेखाटलेल्या फलक चित्रांना कला विषयातील प्रसिद्ध लेखक, चित्रकार व अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथील माजी प्राचार्य जयप्रकाश जगताप यांच्या कला अध्यापनात पुस्तकात स्थान मिळालेले आहे.
भारत पवार यांच्या या फलक चित्रांचा सन्मान या निमित्ताने झालेला आहे.प्रसिद्ध लेखक व कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश जगताप यांच्या कला अध्यापन इंग्रजी आणि मराठी माध्यमातील ए.टी.डी. ए.एम. जी.डी.आर्ट या कलेतील उच्च शिक्षण कोर्सच्या पुस्तकात प्रसिद्ध फलकलेखक भारत पवार यांनी रेखाटलेली फलक चित्रे छापण्यांत आलेली आहेत. जे.जे.आर्ट बुक सिरीजचे हे २८ वे पुस्तक आहे."आर्ट एक्सप्रेशन" या नावाने पुण्यामध्ये प्रकाशित झालेले आहे.भारत पवार सर हे प्रत्येक दिनविशेषला अनुसरून विद्यार्थ्यांना सचित्र माहीत व्हावेत म्हणून विविध दिनविशेष फलक रेखाटन करीत असतात.पालक -विद्यार्थी यांच्यामध्ये या खडूद्वारे चितारलेल्या फलकचित्राची नेहमीच चर्चा होत असते.प्रसार माध्यमातून व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम,वर्तमानपत्रात नेहमीच त्यांची चित्रे बघायला मिळतात.आतापर्यंत त्यांना विविध राज्यस्तरीय, जिल्ह्यास्तरीय पुरस्काराने मोठमोठ्या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यांत आले आहे.या फलक चित्रांची लेखक जयप्रकाश जगताप यांनी दखल घेऊन ती त्यांच्या पुस्तकात छापलेली आहे.
वरील यशाबद्दल पवार यांचे
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे राज्यअध्यक्ष विनोद इंगोले (अमरावती) राज्य सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे (धुळे) प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे - हस्तेकर (औरंगाबाद )मिलिंद शेलार , किरण सरोदे पुणे,राजेश निंबेकर 'विवेक महाजन औरंगाबाद , सातारा विभागीय उपाध्यक्ष सुहास पाटील,रामचंद्र इकारे, तसेच लातूर जिल्हातील जिल्हा अध्यक्ष महादेव खळुरे, कला शिक्षक जयप्रकाश हाराळे, तुकाराम देवकत्ते, पुरुषोत्तम काळे, शिवकुमार गुळवे, लक्ष्मण गुडेवार, संभाजी भोपे, हाणमंत हेळगीरे, बसवेश्वर थोटे, सतीश बैकरे, नागनाथ स्वामी, विवेकानंद मठपती, मोहन तेलंग, प्रदिप माने, जनार्धन फुले, संतोष डावळे, अमृत तिडके, राजकुमार पवार, दिलीप घोडके, महादेव शिरसाठ, सौ.रेखा जाधव , सौ. अर्चना माने, माधव वागलगावे, दिपक हालकंचे, मारोती जाधव आदिनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिलेले आहेत.