*भारतीय संस्कृती आणि सण समारंभ*.......

.


 शुभस्य शिघ्रम अशुभस्य कालहरणम..... अशा प्रमाणे भारतीय संस्कृती मध्ये खूप चांगल्या प्रकारे सणसमारंभ आजचा ताळमेळ जुळून ठेवलेला आहे.आपल्या पूर्वजांचा आपल्याला खरं तर खूप अभिमान वाटावा कारण सण-समारंभ त्यांनी असेच चालू ठेवून येणाऱ्या प्रत्येक पिढीला करण्यासाठी भाग पडण्यासाठी त्यांनी नियमांमध्ये त्याला जखडून ठेवलेला आहे.आपल्या घरामध्ये या सणाला असं करतात त्या सणाला हा नियम आहे,आपण हे काम उत्सहने करू म्हणून प्रत्येक सण उत्साहाने व अट्टाहासाने करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तशाच प्रकारे आपण आज तो करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठा इतिहास दडला आहे. त्याचबरोबर विज्ञान तर आहेच आहे. संस्कृती सणसमारंभ आणि विज्ञान या तिन्ही गोष्टी मुळे भारतीय संस्कृती जगभरामध्ये प्रसिद्ध आहे.

चैत्र महिना  पाडवा येतो तेव्हा, आपण गुढी उभारतो आणि त्याचबरोबर गोड धोड खातो, कडू लिंबाच्या पाल्याचा तीर्थ म्हणून सुद्धा आपण प्राशन करतो जे की शरीराला आवश्यक असते परंतु हा नियम करून ठेवला आहे म्हणून आम्हाला पण अट्टाहासाने थोडं का होईना ते घेतो परंतु सहज जर कोणी म्हटलं की हे शरीराला आवश्यक आहे घ्या तर काही व्यक्ती घेतील परंतु काही व्यक्ती घेणारच नाहीत सुशिक्षित-अशिक्षित दोन्ही लोकांना आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे संस्कृती आहे..

तसेच हळूहळू आपण प्रत्येक सणसमारंभ जमा करायला सुरुवात करतो त्यावेळेला मुद्दाम पुरणपोळी,गोपाळकाला,भज्जी भाकरी, तिळाची पोळी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी- लोणी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी विविध सणांमध्ये आपण करून घेतो कारण ते हवामानानुसार आपली संस्कृती असे सण समारंभामध्ये खाण्याचे पदार्थ सुद्धा बनवून ठेवलेले आहेत.निसर्गात जे जे जे आपल्याला मिळतं ते ते शरीराला अतिशय आवश्यक असतं हे आपल्या भारतीय सण उत्सव  मधून आपल्याला मिळतं आणि ते आपण खात पीत असतो आणि आपली प्रकृती चांगली बनवून घेत असतो याचे एक सुंदर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सध्या 2020 मध्ये सगळीकडे कोरोना होत असताना भारत देशामध्ये ज्या वेळेला करोना आला तेव्हा त्यांना असं आढळून आलं की भारत देशातील व्यक्तींची प्रतिकारक्षमता अतिशय वेगळी आहे ती परदेशातल्या व्यक्तींपेक्षा याचे मुख्य कारण हेच आहे की, आपली संस्कृती सणसमारंभ आणि आपले खानपान..... 

नुसते खानपान नाही तर आपल्या देशामध्ये नातीगोती सांभाळण्यासाठी सुद्धा रक्षाबंधन,भाऊबीज, पंचमी.गणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन, दिवाळी, मकर संक्रांती, असे सण समारंभ एकमेकांना घरी बोलावून फराळ करून सुद्धा आपण साजरे करतो जेणेकरून सर्वांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, खेळण्याचा आनंद स्त्रियांनासुद्धा लुटावा यासाठीच पंचमीला झोका मुद्दाम खेळला जातो सारीपाटाचा खेळ सुद्धा दिवाळीमध्ये मुद्दाम खेळला जातो, नवरातरौत्सव दांडिया,आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांचा आहे...

त्यात लहान अबाल- वृद्ध अशा सर्वांचा देखील वेगवेगळ्या प्रकारे सणांमध्ये समावेश आहे तिळगुळ घेत असताना वडीलधाऱ्यांचा नमस्कार आशीर्वाद घेणे सोने-चांदी देत असताना मोठ्यांकडून घेणे ही जी संस्कृती आहे. ती अतिशय मोलाची आहे आदर भाव काय असतो कोणाकडून काय घेतले पाहिजे लहानांनी मोठ्यांना काय दिले पाहिजे हे सर्वच आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे सणावारांमध्ये दडलेले आहे.

होळी पुरणाची पोळी असे म्हणून आपण सण साजरे करतो आणि होळीमध्ये वाईटाचा नाश म्हणून आपण प्रत्येक गोष्टी वाईट सोडून  देऊन चांगल्या गोष्टीचा स्वीकार करतो.सर्व लहान मुलेसुद्धा भक्त प्रल्हाद सारखे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणून आपली शक्ती वाढून घेतात अध्यात्माकडे वळतात जप,पोथ्या पुराणे ,दीपोत्सव हेसुद्धा आपण चातुर्मासाचा मध्ये खूप करतो जेणेकरून आपल्याला आपल्या मनोवृत्ती मध्ये वाढ होते आणि स्थैर्य, एकग्रता मिळते. हे सर्व कशामुळे आहे तर केवळ आपल्या भारतीय सण समारंभ मुळे म्हणूनच संपूर्ण विश्वामध्ये भारत देश का नंबर वन आहे? तर भारतीय संस्कृती सण समारंभ आणि त्यामध्ये दडलेले विज्ञान......

अज्ञानातून विज्ञानाकडे.... श्रद्धा वरून विश्वास..... संसकृतीमधून संस्कार...असा आपला भारत देशाचा दरबार......

चला आपण सर्वजण अभिमान बाळगू या आपल्या भारतीय संस्कृती सणावारांचा... आपल्यातील आपलेपणाचा.🙏


सौ.मंजुषा कुलकर्णी 

  मुख्याध्यापिका

स. व.प.प्रा. वि.उदगीर.

9881692437