डोंगरशेळकी येथील जवान 19 वर्ष दोन महिने देशसेवा करून परतले त्यांच्या मूळ गावी जल्लोषात स्वागत

 .


उदगीर.......

उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथील सुपुत्र जवान प्रमोद नागनाथ खंदाडे यांनी जम्मू काश्मीरसह विविध भागात 19 वर्ष दोन महिने देश सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याने डोंगेशेळकी येथील त्यांच्या मूळ गावी येताच गावकऱ्यांच्या वतीने 9 ऑगस्ट रोज सोमवारी प्रमोद खंदाडे या जवानांचा गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात गोपीनाथ मुंढे चौक ते धोंडूतात्या मंदिरापर्यंत भव्य वाजत गाजत लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली सेवानिवृत्त जवानांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच नागरबाई कांबळे.उपसरपंच गणपत पवार.पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापले. गुरमे गुंडेराव रामकीशन सहशिक.आनंद जनार्दन अंकुशे सहशिक्षक. नरसिंग मुंढे.व्यंकटराव मरलापले.जनार्दन सिद्धपा अंकुशे.गणेश मुंढे.अर्जुन मुंढे.राहुल पुंड यांच्यासह गावातील सर्व नागरीकांची उपस्थिती होती