खेळाडूवृत्ती अनुभवताना .... प्रा डॉ विजयकुमार कलूरकर

 .


   जपानमधल्या टोकियो ऑलम्पीक मधील मी पाहिलेला ऱ्हदयस्पर्शी अनुभव प्रसंग मी तुम्हाला सांगताना आत्यानंद होतो . तो प्रसंग मला लेखणी च्या स्वरूपात मांडावयाचा प्रयत्न करीत आहे .

                प्रत्येक पालकानी आपल्या मुलाना व प्रत्येक शिक्षकवृंदानी आपल्या सर्व विध्यार्थ्याना वाचावयास लावावा . आपल्या कडे 2021 टोकियो ऑलम्पीक मध्ये एकूण 339 सुवर्णपदक (Gold Meddle ) दिली जाणार आहेत . ते वेगवेगळ्या खेळाच्या प्रकारामध्ये त्यापैकी किती सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडू ची नावे आपल्या आठवणीत राहणार आहेत .तर मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो की आपल्या भारत देशाचे जर नसतील तर ज्यास्तीत ज्यास्त चार किंवा पाच इतर देशाच्या खेळाडुचे नाव आठवणीत राहतील .

             मी लिहित असलेला अनुभव प्रसंग जगामधल्या अनेक भाषेमध्ये चौफेर समाज माध्यमाच्या माध्यमातुन फिरणार आहे . 5 ऑगस्त च्या मध्यरात्री चा प्रसंग असा आहे की या प्रसंगातुन खूप काही शिकायला मिळणार आहे . टोकियो ऑलम्पिक मध्ये उंच उडिच्या स्पर्धा चालु आहेत . त्या ठिकाणी एक स्पर्धेक इटलीचा तांबेरी नावाचा एक खेळाडू तर दुसरा स्पर्धेक कत्तारचा आरशिम नावाचा खेळाडू . हे दोघे अंतीम फेरीत पोहचतात . पहिल्या वेळेस या दोघामध्ये 2.35 मिटरचा बार क्रॉस कारायचा असतो . या पहिल्या वेळेस दोघानाही समान गुण मिळतात .

                   समान गुण मिळाल्यामुळे पंच दुसऱ्या वेळेस 2.36 चा बार क्रॉस ची स्पर्धा लावतात . या दुसऱ्या वेळेसही दोघानाही समान गुण पडतात . पंच पून्हा तिसरी संधी 2.37 बार क्रॉस करण्याची स्पर्धा घेतात यावेळी ही तिसऱ्या स्पधेवेळेसही दोन्हीही खेळाडूना समानच गुण मिळतात . या तिसऱ्या स्पधैवेळी इटलीच्या तांबेरी नावाच्या खेळाडु च्या पायाला दुखापत होते . त्यामुळे तो पुढिल स्पधै तुन माघार घेतो मी दुखापतीमुळे उंच उडी मारू शकत नाही . तो स्वतःला रौप्य पदकाचा मानकरी समजूनच दुःखी होतो .

                  पूढील कत्तारचा जो बारशिम नावाचा खेळाडू आहे त्याच्या पूढे आव्हानच नसते कारण पुढे स्पर्धेकच नसतो . तो एकटाच असतो . त्याला फक्त कसे -बसे उडी मारायची आणि सुवर्णपदकावर आपल नाव कोरायचं असतं .

               पण त्याच्या डोक्यात विचार येतो की अरे माझ्यापुढे कोणीही स्पर्धेक नसताना पराकृम गाजवणं , सुवर्ण पदक जिंकणं यात कसला पराकृम आलाय हे मनाला पटणारे नव्हे .

                   म्हणुन तो पंचाना म्हणतो की, सर " जर मी सुद्धा उंच उडी मारायला नकार दिला तर आम्हा दोघांनाही सुवर्ण पदक देणार का ?" हे वाक्य ऐकूण सर्व पंच एकत्र येवून चर्चा विनिमय करतात व नवीन नियमानुसार ते म्हणतात की 'हो ' .आणी जेव्हा जे होकार देतात तेव्हाचा हा घडलेला ऐतिहासीक प्रसंग आहे .

               या स्पधैत दुखापतीमुळ तांबेरी नावाचा खेळाडू रौप्यपदकाची अपेक्षा करून बसलेला होता . त्याला सुवर्णपदक मलाही मिळणाराय समजल्यावर पूढील त्याचा स्पधैक असलेल्या कत्तारच्या बारशिम नावाच्या खेळाडूच्या काखेत उडी मारून त्याला घट्ट पकडुन धाय मोखुन आनंदाश्रु गाळू लागला .

                  मित्राणों बघा या जगामध्ये आपल्याला स्पर्धेकच राहणार नाही याची काटेकोर पणे प्रत्येकजण काळजी घेत असतो . तेथे असे घडणे नवलचं . आपल्या कोणत्याही सामाजिक, राजकीय, शैक्षणीक , औधोगिक व सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये आपल्याला कोणीही स्पधैक राहुच नये याची आपण कटाक्षाने काळजी घेतो . येथे मात्र एक प्रेरणादायक प्रसंगच .

             जगामध्ये असं एकमेव क्षेत्र क्रिडाक्षेत्र असं आहे कि जिथं जात , धर्म, पंत, वंश, भाषा, प्रांत व बॉर्डर याच्या पलीकडे जावून माणुसकीचं दर्शन घडविले जाते, खेळाडूवृत्ती जागवली जाते .

                 मी कमावलेल्या पराकृंमाचा मला स्वतः अनुभव वाटला पाहिजे आणि हे सगळं फक्त आणि फक्त खेळातूनच घडतं . माझी देशातील तमाम पालक वर्गाना व शिक्षक वृंदाना विनंती आहे की . मूलांना खेळामध्ये करियर करू दया, मुलाला मैदानी खेळ खेळायला पाठवा शिकत असलेल्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या संघात त्याला सहभाग घेवू दया . तो जिकेल किंवा न जिंकेल पण त्याला खेळू दया . तो हारला तर हार पचवायची ताकत निर्माण होईल , आणि जिकंण्याची जिद्द निर्माण होईल .

" खेळ हेच जीवन , जीवन हाच खेळ "

               प्रा डॉ विजयकुमार तुकाराम कलूरकर

            9763526005

Email vtkallurkar@gmail.com