किशन उगले यांची राष्ट्रीय साहित्य लेखन प्रशिक्षणासाठी निवड

 .


उदगीर/प्रतिनिधी : साहित्य अकादमी नवी दिल्ली व राष्ट्रीय भाषा प्रचार व प्रसार अकादमी श्रीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर भारतातील नामांकीत साहित्यिकांची साहित्य लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी देशातील एकूण ८५ साहित्यिकांना पाचारण करण्यात आले असून यात बनशेळकी ता.उदगीर येथील व्यंकटराव देशमुख विद्यालयातील शिक्षक तथा शेकापूर येथील रहिवासी प्रख्यात समीक्षक श्री .किशन उगले यांची निवड करण्यात आली आहे.तसेच या कार्यशाळेच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील प्रबंध ग्रंथ प्रकाशीत करण्यात येणार असून यात श्री.किशन उगले यांचाही प्रबंध राहणार आहे. त्यांना यापूर्वी अंबाजोगाईचा मराठवाडा कलाभूषण पुरस्कार , नवी दिल्ली चा राष्ट्रीय साहित्य लेखन पुरस्कार, अहमदनगरचा दया पवार पुरस्कार, नागपूरचा समीक्षा लेखन पुरस्कार, देहूचा संत तुकाराम पुरस्कार, लातुरचा चंद्रकांत मांढरे पुरस्कार, जळगावचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार, औरंगाबादचा लोककला पुरस्कार, औरंगाबादचाच यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कोल्हापूरचा नाटय दिग्दर्शनाचा पुरस्कार, महाड( रायगड)चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, बीडचा साहित्य रत्न पुरस्कार, सोलापूर चा कविताश्री पुरस्कार, पुणेचा शिवनेरी नाटय पुरस्कार, नागपूरचा गझल सम्राट सुरेश भट जागतीक काव्यशिष्य पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.हैद्राबाद येथील इ टीव्ही वाहिनीवर सहा वेळा काव्यवाचन ,आकाशवाणी औरंगाबाद परभणी केंद्रावर पाच वेळा काव्यवाचन प्रसारित झाले आहे.श्री. किशन उगले यांची राष्ट्रीय साहित्य लेखन प्रशिक्षण साठी निवड झाल्याबद्दल त्यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.