उदगीर चे सुपुत्र दीपक नावंदे यानां जगातील टॉप व्यवसाय लिडर म्हणून मुंबईत गौरव!

 .




उदगीर (प्रतिनिधी)--उदगीर चे सुपुत्र  व पुण्याचे सुप्रसिद्द उद्योजक दीपक काशिनाथ नावंदे यानां ( फॉउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर - सॅफरॉन हॉलिडेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड )  यांना २०२१ चा वर्ल्ड कौन्सिल ऑफ ब्रँड रिसर्च, न्यूज इंडिया १ आणि  MSME 

चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया तर्फे जगातील टॉप १०० सर्वात प्रभावशाली व्यवसाय लिडर म्हणून त्यांना मुंबई त्यांना गौरव करण्यात आला. 

यामध्ये विविध क्षेत्रातील केमिकल, पोलाद, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, मेट्रो रेल्वे व्हेंडर्स, कापड जगतातील व्यापारी, IT कंपनी, फार्मासिटिकल्स कंपनी आणि टुरिझम  ब्रँड कंपनीना गौरविण्यात आले, त्यामध्ये ट्रॅव्हल & टुरिझम जागतिक क्षेत्रात सर्वात प्रभावशाली कंपनी म्हणून सॅफरॉन हॉलिडेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ला गौरविण्यात आले. या सुवर्ण क्षणी कंपनीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि कंपनीचे फॉउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर  दीपक नावंदे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम २७ ऑगस्ट २०२१ रोजी हॉलिडे इन छ. शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई येथे पार पडला.

दीपक के. नावंदे  हे पुणे आणि मुंबई भारतातील आघाडीचे उद्योजक आहेत. ते सॅफरॉन हॉलिडेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, हि एक भारतातील अग्रगण्य प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. २०२१ पर्यंत ती भारतात ६ शाखांद्वारे चालवली जाते. त्याचे पहिले शाखा कार्यालय वाशी, नवी मुंबई येथे उघडण्यात आले. मुख्यालय हिंजवडी फेज १, पुणे येथे आहे आणि बुकिंग कार्यालये मुंबई, म्हैसूर, बेंगळुरू, जम्मू, कोचीन आणि पुणे येथे देखील सुरू आहेत. त्यांनी व्यवसायाचा विस्तारही केला आणि खूप झपाट्याने भारतभर शाखा वाढवत आहेत. सॅफरॉन हॉलिडेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हि आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्रमाणित आणि ट्रिप अॅडव्हायझर पुरस्काराने भारताचा आघाडीचा विश्वासार्ह ब्रँड म्हणून अगोदर हि गौरविलेला आहे. जो कौटुंबिक सुट्टीच्या दौऱ्यासाठी जागतिक दर्जाच्या सुट्ट्या सादर करतो आणि हिमाचल प्रदेश, मनाली, काश्मीर, लडाख, कुर्ग, गोवा, केरळ, ऊटी, सिक्कीम, दार्जिलिंग आणि राजस्थान या ठिकाणी पर्यटकांसाठी लक्झरी आणि कम्फर्टेबल हॉलिडेज ची साठी प्रसिद्ध आहेत.  बारा वर्षांच्या वरील कौशल्य पर्यटन आणि आतिथ्य व्यवसायामुळे पाहुण्यांच्या तपशीलांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ते आदर्श प्रवासाशी संबंधित सेवा देतात. भारतातील आघाडीची ट्रॅव्हल मॅनेजमेंट कंपनी. त्वरित बुकिंग आणि सर्वसमावेशक पर्यायांसह प्रवाशांना सक्षम करण्यासाठी तयार केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चोवीस तास समर्पित ग्राहक समर्थनासह सर्वोत्तम-मूल्यवान उत्पादने आणि सेवांची श्रेणी देणे हे त्याचे उद्दिष्ट होते.

दीपक नावंदे हे नेहमी लोकांच्या मदतीसाठी असतात, कोरोना काळात ते केवळ पुणे, मुंबईतच नव्हे तर त्यांच्या कार  व्हेंडर्सच्या मदतीने भारतभरातील लोकांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी कोरोना पिढीत रुग्णांसाठी २४ मदत  केली आणि त्यांच्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आणि त्यांची संपूर्ण टीम कोरोनाच्या काळात लोकांसाठी  काम करत होते आणि ते स्वतः पुण्यात चोवीस तास धावताना दिसले. २०२० मध्ये हि अचानक लॉकडाऊन घोषित करण्यात आले आणि तामिळनाडू आणि केरळमधील हॉटेल्स बंद करण्यात आली आणि ट्रिपमध्ये अडकलेल्या अनेक लोकांना परत आणण्यात आले आणि त्यावेळेस हि लोकांच्या मदतीसाठी पुढे आली.या सर्व कार्यमूळे त्याचां जगातील टॉप व्यवसाय लिडर म्हणून मुंबईत गौरव करण्यात आला.त्यांना पुरस्कार मिल्याबदल पुणे व् उदगीर  मधील मित्र परिवारकडुन  अभीनंदन होत आहे.

Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत