ज्याचा माल त्याचा हमाल कायदा लागू करण्याची जनलोक मोटार मालक चालक मेकॅनिक असोसिएशनची मागणी

.


 उदगीर :- अवैध रित्या घेतल्या जाणाऱ्या वाराई व हमाली बंद करून ज्याचा माल त्याचा हमाल कायदा लागू करण्यात यावा यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय.तहसील कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उदगीर यांना यापूर्वी निवेदन दिले होते त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर समोर 6 ऑगस्ट रोज शुक्रवारी जनलोक मोटार मालक चालक मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने मालवाहतूक गाड्या थांबवून आंदोलन करण्यात आले लातूर जिल्ह्यात व्यापारी व हमाल ट्रक चालक मालकाकडून अवैध रित्या वाराईच्या नावाखाली मोठया प्रमाणात वसुली केली जात आहे ही वसुली शासन निर्णय 2015 कामगार कायदा 6/9/2016 च्या  कार्यवाहीच्या सूचना 2 क नुसार अवैध आहे या शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी  व वसुली करण्यात यावी अशी वसुली करणाऱ्या विरुद्ध शासनाच्या नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आंदोलनात करण्यात आली आहे या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष मुक्रम अब्दुल रहेमान जागीरदार सचिव मोईज शेख लातूर जिल्हा अध्यक्ष रियाज युसूफ मुजावर फिजर अजहर मोमीन संस्थापक कार्याध्यक्ष राजा पटेल अब्दुल बशीर शहर अध्यक्ष शेख नजीर अहेमद संस्थापक उपाध्यक्ष मोहम्मद झाकीर राजापटेल.अरविंद कांबळे आदी उपस्थित होते