राजेश्वर निटूरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा*

 .






उदगीर :........ उदगीर नगर पालिकेचे सात वेळा नगराध्यक्ष पद भूषविलेले माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचा वाढदिवसानिमित्त भिम शौर्य युवा मंच उदगीरच्या वतीने  विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला

       उदगीर नगरीचे लाडके माजी नगराध्यक्ष, गरीबाचे कैवारी समजले जाणारे राजेश्वर निटूरे यांच्या वाढदिवसानिमित्त भिम शौर्य युवा मंच उदगीर च्या वतीने उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पोलीस स्टेशन समोर गरजु लोकांना अन्न व फळ वाटप करण्यात आले तसेच शासकीय सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले  बेघर निवारा केंद्र येथे वरक्षारोपन करून  बेघर निवारा केंद्रातील राहणाऱ्या लोकांना भोजनाची सोय करून राजेश्वर निटूरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे, नितीन गायकवाड, रवि बनसोडे,  प्रदीप महापुरे, परमेश्वर बन, राजकुमार माणसे, अतुल कांबळे, नरेश चांदे, शुभम माणसे यांनी परिश्रम घेतले