*सामाजिक आणि राजकीय परिस्थिती उजागर करणारी साहित्यकृती म्हणजे स्ट्राईक*. -- डॉ नरसिंह भिकाने

  .




 उदगीर.....    प्रत्येकाच्या जीवनात माणुसकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजात वावरताना राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक संकटे अनपेक्षितपणे समोर येत आहेत. त्यावर परखडपणे भाष्य करत आपल्याला आलेले अनुभव कवितेच्या रुपात मांडणी करून सामाजिक आणि राजकीय परिस्थिती उजागर करणारी साहित्यकृती म्हणजे स्ट्राईक होय असे मत डॉ नरसिंह भिकाने यांनी व्यक्त केले.

      आजच्या पिढीत वाचन संस्काराची रुजवणूक व्हावी म्हणून चला कवितेच्या बनात या चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी कोरोना  परिस्थितीतही अविरतपणे आणि सातत्याने वाचक संवाद चालू असून याच मालिकेतील २४६ वे पुष्प प्रत्यक्षात व फेसबुक लाईव्ह आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र दिपक बलसुरकर हे होते तर डॉ नरसिंह भिकाने यांनी स्वलिखित स्ट्राईक या साहित्यकृतीवर संवाद साधताना आपल्या कुटूंबातील स्नेहपूर्ण नाते, मानवी स्वभाव, सामाजिक आणि राजकीय जीवनातील अनेक अनुभवा बरोबरच राजकीय परिस्थिती आणि प्रसंगाचे वर्णन या साहित्यकृतीत केल्याचे सांगितले.

         

यानंतर झालेल्या चर्चेत वर्षाराणी चव्हाण, श्रीमती  कलबुर्गे , किशन उगले, नरसिंह ढोणे, शांताबाई गिरबणे, मोहन निडवंचे, आदिंसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यानंतर उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली.मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शेवटी बलसुरकर यांनी यथोचित अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबूराव सोमवंशी, मुरलीधर जाधव, प्रा राजपाल पाटील, प्रा सुरेश शिंदे आणि अनंत कदम यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन विरभद्र स्वामी यांनी केले, पाहुण्यांचा परिचय किशन उगले यांनी करून दिला तर आभार हणमंत म्हेत्रे यांनी मानले.