कै. रतनबाई क.महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

 उदगीर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कै. रतनबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.गायकवाड बुध्दप्रिया राजेंद्र ही महाविद्यालयातून प्रथम आली आहे तर कांबळे रत्नदीप संजय हा द्वितीय व गायकवाड नरसिंग कचरू हा तृतीय आला आहे. एकूण विद्यार्थ्यापैकी  २८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह व २ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सोमासे राम केरबा, प्राचार्य राजकुमार सोमासे , प्रा.बडीहवेली राजकुमार , प्रा.किशन सोमासे , प्रा.राजेंद्र सुगावे , प्रा.टी. पी.कांबळे , प्रा.सोमासे के.व्ही. , आदींसह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. कै. रतनबाई कनिष्ठ महाविद्यालयाने याही वर्षी उज्जवल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.